Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीयशिर्डी

शिवसेना उद्धव गटाचे रावसाहेब खेवरे अखेर शिंदे शिवसेनेत दाखल उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का

शिर्डी : शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले रावसाहेब खेवरे यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात रावसाहेब खेवरे यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


दीर्घकाळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत कार्यरत असलेल्या खेवरे यांच्या पक्षांतरामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, खेवरे यांच्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाला स्थानिक पातळीवर मोठा धक्का बसल्याची चर्चा असून, आगामी काळात आणखी काही पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button