Letest News
‘विखेंनी साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगावे!’ – नगर–मनमाड रस्त्यावर निलेश लंके यांचा थेट हल्ला साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या भाविकांवर डल्ला! शिर्डीत चैनस्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद-स्थ... १५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्...
अ.नगरशिर्डी

श्री साईनाथ रुग्‍णालयात मोफत त्‍वचा रोग तपासणी शिबीराचे उद्घाटन

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व सुमुखा लक्ष्‍मी व्‍यंकटेश्‍वरा चॅरीटेबल ट्रस्‍ट, म्‍हैसुर यांचे संयुक्‍त विद्यमाने मोफत त्‍वचारोग तपासणी शिबीर आज दिनांक २४ ऑक्‍टोबर २०२४ ते २६ ऑक्‍टोबर २०२४ या दरम्‍यान श्री.साईनाथ रुग्‍णालय (२०० रुम) येथे आयोजीत करण्‍यात आलेले आहे. या शिबीराचा उद्घाटन समारंभ श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, गोरक्ष गाडीलकर,भा.प्र.से यांचे अध्‍यक्षतेखाली

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

श्री साईनाथ रुग्‍णालय (२०० रुम) येथे सकाळी १०.०० वा पार पडला. सदर शिबीरासाठी महाराष्‍ट्रभरातुन ३१० रुग्‍णांनी नोंदणी केलेली असुन अजुन नोंदणी सुरु आहे. येत्‍या तीन दिवसात शिबीरामध्‍ये जास्‍तीत जास्‍त रुग्‍णांनी सहभागी होवुन शिबीराच्‍या माध्‍यमातुन होणा-या रुग्‍णसेवेचा लाभ घ्‍यावा असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी बोलताना केले.


सुमुखा लक्ष्‍मी व्‍यंकटेश्‍वरा चॅरीटेबल ट्रस्‍ट, म्‍हैसुर येथील त्‍वचारोग तज्ञ डॉ. शिवाणी एस.आर., डॉ. हंमसा सी.एन. व श्री साईनाथ रुग्‍णालयातील त्‍वचारोग तज्ञ डॉ. कांबळे यांचा मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,भा.प्र.से यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करणेत आला.

याप्रसंगी श्री साईबाबा संस्‍थान रुग्‍णालयाचे प्र.उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, प्र. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरे, कार्यालय अधिक्षक प्रमोद गोरक्ष, प्र.अधीसेविका नजमा सय्यद, सहा अधिसेविका मंदा थोरात, जनसंपर्क अधिकारी (रुग्‍णालये) सुरेश टोलमारे यांच्यासह श्री साईनाथ रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. शिबीर यशस्‍वी व्‍हावे यासाठी श्री साईनाथ रुग्‍णालयातील सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button