Letest News
शिर्डीत ‘जमीन सौदा’ बॉम्ब फुटणार? भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातच्या ५० कोटींच्या व्यवहारावर पोलिसांची ... पोटनिवडणुकीत माध्यमांवर कडक नियम-जाहिरातींसाठी पूर्व मंजुरी अनिवार्य नाशिक प्रकरणात खळबळ! भोंदू बाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ – ‘५ नरबळी’चा धक्कादायक संशय शिर्डीतील ‘क्लासिक आइसक्रीम’ची जागतिक भरारीकडे वाटचाल-नूतन आइसक्रीम युनिटचे भव्य उद्घाटन   ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ  वाघचौरे यांना फसवण्याचा... सुपर ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट asp वाघचौरे यांना फसवण्याचा प्रयत्न फसला! ६,५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा परिषद अभियंता जाळ्यात! ACB ची धडक कारवाई शिर्डीत ११५ वा श्रीरामनवमी उत्सव-लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी भव्य तयारी पूर्ण! खरातचा काळा खेळ उघड! शिर्डी पोलिसांची गुप्त मोहीम ठरली निर्णायक शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई
अ.नगरशिर्डी

मोफत जयपुर फुट व कृत्रीम पाय रोपन शिबीर ठरणार दिव्यांगासाठी वरदान

महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई) जयपुर यांचे संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रीम पायरोपन (जयपुर फुट) शिबीर व गरजु दिव्यांगासाठी साहित्य वाटप दिनांक दि. २६/०९/२०२४ ते दि.३०/०९/२०२४ या दरम्यान श्री. साईनाथ रुग्णालय (२०० रुम) येथे आयोजीत करणेत आलेले आहे. सदरील शिबीराचा उद्घाटन समारंभ श्री. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से यांचे अध्यक्षतेखाली श्री साईनाथ रुग्णालय (२०० रुम) येथे नुकताच पार पडला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

सदर शिबीराचे वेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदरील जयपुर फुट शिबीराचा लाभ घेवुन सर्व दिव्यांग बांधवानी तुमच्यावर निसर्गाने केलेल्या अन्यायाच्या विरोधात मार्गक्रमण करा. हे शिबीर दिव्यांग बांधवांसाठी लाभकारक ठरणार असुन सर्व दिव्यांग बांधवाना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल. यातुन त्यांच्या आयुष्यात निर्माण होणारा आत्मविश्वास आनंद हा नक्कीच त्यांच्या आयुष्यात कलाटणी देणारा असेल.

श्री साईबाबांचे रुग्ण सेवा हिच ईश्वरसेवा या शिकवणीनुसारच गरीब व गरजु रुग्ण, दिव्यांग यांचेकरीता श्री साईबाबा संस्थानमार्फत विविध शिबीर नेहमी आयोजीत करत राहणार आहे. शिबीराकरीता सुमारे ७१० दिव्यांग बांधवानी नोंदणी केलेली असुन अजुन नोंदणी सुरु आहे.

यावेळी श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई) जयपुर यांचे श्री नारायणजी व्यास व त्यांची संपुर्ण टिम व ओम साईराम मित्र मंडळ बिडकीन ता. पैठण यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते सत्कार करणेत आला.

या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी, तुकाराम हुलवळे, प्र.उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, प्र. वैद्यकीय अधीक्षक, डॉ. मैथिली पितांबरे प्र. अधीसेविका, नजमा सय्यद जनसंपर्क अधिकारी, सुरेश टोलमारे यांच्यासह श्री. साईनाथ रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. शिबीर यशस्वी व्हावे यासाठी श्री साईनाथ रुग्णालयातील सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, श्री. प्रसन्न धुमाळ यांनी केले तर प्रस्तावीक, डॉ. मैथिली पितांबरे यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री साईबाबा संस्थान रुग्णालयांचे जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button