Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरराजकीय

जिल्ह्यात १८ लाख २३ हजार आयुष्यमान कार्डधारक आयुष्मान कार्ड निर्मितीसाठी विशेष मोहीम – नागरिकांनी सहभाग घ्यावा

अहिल्यानगर, :

sai nirman
जाहिरात

जिल्ह्यात १० लाख ५५ हजार कुटुंबांचा समावेश असून, यामधील ४१ लाख ६५ हजार लाभार्थी आयुष्यमान कार्डसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत १८ लाख २३ हजार आयुष्मान कार्ड तयार करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनी आपले आयुष्मान कार्ड काढावेत,

DN SPORTS

kamlakar

यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष मोहिमेत नागरिकांनी कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले आहे.

जिल्ह्यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) यांची एकत्रित अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनांमुळे लाभार्थ्यांना प्रति कुटुंब ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार असून १३५६ प्रकारच्या शस्त्रक्रिया व विशेष उपचारांचा समावेश आहे.

तसेच कुटुंबातील ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना “आयुष्मान भारत वय वंदना कार्ड” च्या माध्यमातून अतिरिक्त ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील सदस्याकडे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड असणे आवश्यक आहे. हे कार्ड स्वतः लाभार्थी, आशा स्वयंसेविका, आपले सरकार सेवा केंद्र तसेच स्वस्त धान्य दुकानदार (राशन दुकानदार) यांच्यामार्फत सहज उपलब्ध आहे. तसेच गूगल प्ले स्टोअरवरून “आयुष्मान अॅप” डाउनलोड करूनही सुविधा मिळू शकते.

लाभार्थ्यांनी कार्ड तयार करण्यासाठी https://beneficiary.nha.gov.in/](https://beneficiary.nha.gov.in/ या पोर्टलवर भेट द्यावी किंवा गूगल प्ले स्टोअरवरून “आयुष्मान अॅप” डाउनलोड करून आवश्यक माहिती भरावी. आधार क्रमांक, राशन कार्ड व नोंदणीकृत मोबाईल क्रमांक यांच्या आधारे ओटीपी टाकून नोंदणी करता येते.

त्यानंतर कुटुंबातील सदस्यांची माहिती भरून, छायाचित्रासह अर्ज सादर करून कार्ड डाउनलोड करता येते. या प्रक्रियेसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड व लाभार्थ्याचा जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.

लाभार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ३१ ऑगस्ट २०२५ यापर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व सरपंच यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा,

आयुष्यमान कार्डच्या दैनंदिन प्रगतीवर जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष ठेवावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केल्या आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button