Letest News
नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप
राजकीयशिर्डी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार

शिर्डी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रवेश केल्यानंतर संपूर्ण मतदारसंघात शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर खा. वाकचौरे यांच्या निवासस्थानी जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी उपस्थित राहत मोठ्या जल्लोषात त्यांचा सत्कार केला.
यावेळी फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि जल्लोषाच्या वातावरणात शिवसैनिकांनी खा. वाकचौरे यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांना शुभेच्छा दिल्या. “एकनाथ शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं”, “भाऊसाहेब वाकचौरे तुम आगे बढो, आम्ही तुमच्या सोबत आहोत” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “विकासाचा ध्यास आणि जनतेचा विश्वास मिळविणारे खा. भाऊसाहेब वाकचौरे हे मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहेत. शिवसैनिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही एकदिलाने काम करू.”
यावेळी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधताना मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. “हा मतदारसंघ विस्ताराने मोठा आहे. मात्र प्रत्येक गावातील, प्रत्येक नागरिकाच्या समस्या मला माहिती आहेत. प्रश्न छोटे असोत किंवा मोठे, ते सोडवून जनतेने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन,” असे त्यांनी सांगितले.


दरम्यान, शिवसैनिकांनी शहरातील रिक्षांवर खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या छायाचित्रांचे नवीन स्टिकर्स लावण्यास सुरुवात केली असून, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. मतदारसंघात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला नव्याने बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button