Letest News
साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
अ.नगरक्राईम

#StopFemaleFoeticide#भ्रूणहत्या रोखण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा सरसावले

शिर्डी मतदारसंघातील राहाता तालुक्यात बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करून स्त्री भ्रूणहत्या केल्या जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या संतापजनक प्रकाराविरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी थेट राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर यांची मुंबई येथे भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


राहाता तालुक्यात काही ठिकाणी गुप्तपणे गर्भलिंग निदान करून मुलगी असल्याचे समजताच स्त्री भ्रूणहत्या केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे डॉ. पिपाडा यांनी आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. राज्यभरातून लोक येथे येऊन अशा बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देत असल्याची बाब अत्यंत लाजिरवाणी व समाजासाठी घातक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या अमानुष प्रकारामुळे मुलगी जन्माला येण्याआधीच तिचे अस्तित्व संपविले जात असून समाजात अत्यंत चुकीचा संदेश जात आहे. स्त्री भ्रूणहत्या थांबविणे ही केवळ प्रशासनाची नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी असून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला कोणतीही माफी दिली जाणार नाही, असेही डॉ. पिपाडा यांनी ठामपणे सांगितले.
तसेच राहाता शहरासह शिर्डी मतदारसंघाची या बेकायदेशीर कृत्यांमुळे बदनामी होत असल्याचे सांगत प्रशासनाने तात्काळ विशेष पथक स्थापन करून संबंधित रुग्णालये, सोनोग्राफी केंद्रे व डॉक्टरांची सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.


दरम्यान आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाला चौकशीचे आदेश दिले असून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.



“भ्रूणहत्या म्हणजे जन्माला येणाऱ्या बाळाचा खून”
राज्यात सुरू असलेल्या गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्या प्रकरणावर आमदार प्रशांत बंब यांनीही विधानसभेत आवाज उठविला आहे. गर्भलिंग निदान करून भ्रूणहत्या करणारे डॉक्टर हे प्रत्यक्षात जन्माला येणाऱ्या बाळाचा खून करत असून त्यांच्यावर थेट खुनाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी ठाम भूमिका त्यांनी सभागृहात मांडली.
— प्रशांत बंब, आमदार (गंगापूर-खुलताबाद)

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button