Letest News
भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी! समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात!
राजकीयशिर्डी

जबलपूरच्या साईभक्ताकडून ६.२८ लाखांचा सुवर्ण मुकुट तर वडोदऱ्याच्या भक्ताकडून ३.३४ लाखांचे सुवर्ण ‘ॐ’ दान

शिर्डी : श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून, भक्तिभावाने ते श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या प्रथमदिनी मंगळवार (दि. २८ जुलै २०२६) रोजी दोन साईभक्तांनी श्री साईबाबांच्या चरणी सुवर्ण दान अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली.
मध्यप्रदेशातील जबलपूर येथील साईभक्त श्री. ए. के. शर्मा यांनी श्री साईबाबांच्या चरणी ४८ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला. या सुवर्ण मुकुटाची किंमत ₹६ लाख २८ हजार ७५२ इतकी आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


तसेच गुजरातमधील वडोदरा येथील साईभक्त श्री. विजय बालकृष्ण नाईक यांनी २५.५३० ग्रॅम वजनाचे दोन आकर्षक सुवर्ण ‘ॐ’ श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केले. या सुवर्ण ‘ॐ’ची एकूण किंमत ₹३ लाख ३४ हजार ४१७ इतकी आहे.
भाविकांकडून अर्पण करण्यात आलेले हे सुवर्ण अलंकार त्यांच्या श्री साईबाबांप्रती असलेल्या अढळ श्रद्धेचे, निस्सीम भक्तीचे आणि समर्पण भावनेचे प्रतीक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे यांनी दानशूर साईभक्तांचा सत्कार करून त्यांच्या भक्तीभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button