Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
राजकीयशिर्डी

पत्रकार दिलीपराव खरात यांना मातृशोकमाणुसकीची शिकवण देणाऱ्या कचराबाई खरात यांचे दुःखद निधन

राहाता–शिर्डी | प्रतिनिधी
ता. २९ डिसेंबर २०२५
जगाचे मित्र म्हणून ओळख असलेले, संवेदनशील आणि समाजाभिमुख पत्रकार दिलीपराव खरात यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री कचराबाई खरात यांचे आज पहाटे पावणे सहाच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्या नव्वदीच्या पुढील वयाच्या होत्या.
कचराबाई खरात यांनी आयुष्यभर कष्ट, संयम आणि माणुसकीची शिकवण देत संसाराची घडी नीट बसवली. अभावाच्या काळातही त्यांनी मुलांना संस्कारांची शिदोरी दिली. “मुले समाजात कशी वागतात, हे बहुतांशी आई–वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांवर अवलंबून असते” याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खरात कुटुंब.
पत्रकार दिलीपराव खरात हे नेहमीच दुसऱ्याच्या दुःखात धावून जाणारे, मदतीचा हात देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. त्यांचे हे समाजशील व्यक्तिमत्त्व हे त्यांच्या मातोश्रींच्या संस्कारांचेच फलित असल्याचे जाणवते. खरात बंधूंची आईवर असलेली निस्सीम भक्ती सर्वश्रुत होती. आईच्या सेवेत कधीही कसूर ठेवली नाही, हे परिसरातील अनेकांनी आवर्जून नमूद केले.
पालिका निवडणुकीत “दोन हात आणि तिसरे मस्तक जोडले, तर चकित करणारी मते मिळू शकतात” हे सामाजिक सूत्र खरात कुटुंबातील वसंतराव खरात यांनी प्रत्यक्षात दाखवून दिले. हे यशही कुटुंबात रुजलेल्या संस्कारांचेच प्रतिबिंब असल्याचे बोलले जाते.
निवृत्त कलाशिक्षक राजेंद्र निकाळे सर हे कचराबाई खरात यांचे जावई आहेत. डॉ. माईद रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये मित्रवर्य दिलीपराव खरात आईच्या आठवणी सांगताना दिसले. बालपणीचा जीवनपट त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहत होता. आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावत होत्या. याच रुग्णालय परिसरात निकाळे सरांच्या मातोश्रींचीही भेट झाली. जुन्या पिढीतील ही “पिकलेली पाने” आजच्या पिढीला माणुसकीचा धडा देऊन जात असल्याची भावना अनेकांच्या मनात दाटून आली.
त्या काळात पैसा कमी होता, पण माणुसकी मात्र ओसंडून वाहत होती. माणुसकीचा हा झरा अखंड वाहता ठेवणाऱ्या पिढीतील एक पिकलेले पान आज पहाटे गळून पडले, अशी भावना व्यक्त होत आहे.
आईच्या जाण्याने खरात कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
“आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी…
ती हाक येई कानी, मज होय शोककारी…
आई कुणा म्हणू मी, स्वामी तिन्ही जगाचा…
आईविना भिकारी…”
स्व. कचराबाई खरात यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
शोकाकूल,
जितेश लोकचंदानी
संपादक
दैनिक साईदर्शन

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button