निर्मळपिंप्री मारहाणी प्रकरणी 70 ते 80 लोकांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल

शिर्डी (प्रतिनिधी) राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथे झालेल्या मारहाण व शिवीगाळ प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गुन्हेगारांवर कारवाई होत आहे. या मारहाण व शिवीगाळ प्रकरण महाराष्ट्र राज्यात गाजले असून या संदर्भात अधिक माहिती अशी की,
शारदा सुधाकर कोळगे( वय 45) धंदा मजुरी जात हिंदु / महार रा. निर्मळ पिंप्री स्वामी समर्थ
मंदीराजवळ, ता राहाता जि अहमदनगर
फिर्याद दिली आहे की ,मी वरील ठिकाणी घरात माझे पती सुधाकर त्रिंबक कोळगे, दोन मुले मनोज सुधाकर कोळगे व विशाल सुधाकर कोळगे सुन प्रियंका मनोज कोळगे व नात हर्षीता असे एकत्र राहावयास असुन आम्ही मोलमजुरी दिनांक 04/12/2023 रोजी माझा मुलगा विशाल सुधाकर कोळगे, व सोबत आकाश अंबरनाथ गिरी, अजय रावसाहेब पारखे, दिपक सुर्यकांत बर्डे असे हॉटेल साईकिरण परमीटरुम येथे दुपारचे वेळेला दारु पिण्यास बसले होते तेथेच दत्तात्रय छबु निर्मळ रा निर्मळपिंप्री व त्याचे सोबत असलेले काही लोक हे दारु पित होते तेथे विशाल सुधाकर कोळगे व दत्तात्रय छबु निर्मळ यांचेत वाद झाले होते व तेथे निर्मळ पिंप्री गावातील सोमनाथ सुर्यभान घोरपडे, रवि सोपान निर्मळ ,व सुनिल मुरलीधर घोरपडे तसेच माझा पुतण्या करण विलास कोळगे असे येऊन ते भांडण मिटवले होते.
मात्र तेथे सोमनाथ सुर्यभान घोरपडे याने माझा मुलगा विशाल सुधाकर कोळगे यास गचांडी पकडुन शिवीगाळ केली होती व हॉटेल मालकाने वेटरसोबत वाद झाल्यामुळे राहाता पोलीस स्टेशन येथे त्याबाबत तक्रार दिलेली आहे . त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी माझा मुलगा विशाल सुधाकर कोळगे याने दिपक रघुनाथ निर्मळ यास फोन लाऊन सोमनाथ सुर्यभान घोरपडे यास अश्लील शिवीगाळ केली होती व ती शिवीगाळ केल्याची ऑडीओ क्लीप दिपक रघुनाथ निर्मळ याने गावातील ग्रुपवर पाठविली तसेच ती सोमनाथ सुर्यभान घोरपडे यास तसेच गावातील प्रतिष्ठींत लोकांना पाठवली त्यावरुन दिनांक 04/06/2023 रोजी सायंकाळी वाद झाले होते परंतु ते वाद आम्ही तसेच गावातील प्रतिष्ठीत लोकांनी मध्यस्थी करुन मिटवले होते मात्र गावातील काही लोकांनी गाव बंद बाबत कळवुन गाव बंद ठेवले होते
18 त्यानं दिनांक 06/12/2023 रोजी दुपारी 01/00 वा चे सुमारास आमचे गावातील ग्रामपंचायत कर्मचारी रविंद्र निर्मळ व गणेश जाधव असे माझे घरासमोर आले त्यावेळी घरी मी तसेच माझा मुलगा मनोज सुधाकर कोळगे माझे पती सुधाकर त्रिंबक कोळगे, सुन प्रियंका मुलगी सुजाता सुधाकर कोळगे असे असताना ते म्हणाले की, गावातील लोकांनी माझेकडे निरोप दिला की सायंकाळी 06/00 वा पर्यंत विहाड भरुन गाव सोडुन निघुण जायचे त्यावर आम्ही त्यांना लेखी मागीतले मात्र ते निघुण गेले त्यानंतर सायंकाळी 06/30 वा चे सुमारास निर्मळ पिंप्री गावातील 1) सुनिल मुरलीधर घोरपडे 2 ) सचिन भाऊसाहेब घोरपडे 3) राजेंद्र दिगंबर निर्मळ 4) नारायण मुरलीधर घोरपडे 5) सोमनाथ सुर्यभान घोरपडे 6 ) वनिता सोमनाथ घोरपडे 7) शिवनाथ रेवाजी घोरपडे 8) शुभमं विलास घोरपडे 9) रोहन बाळासाहेब निर्मळ 10) संजय शिवाजी कदम 11) कैलास धोंडीराम घोरपडे 12) नंदु गोवर्धन निर्मळ 13) संदीप गोरक्ष घोरपडे 14 ) कैलास सोन्याबापु घोरपडे 15) नितीन बाबासाहेब घोरपडे 16) दिपक रघुनाथ निर्मळ 17 ) बाळासाहेब रघुनाथ निर्मळ 18) रमाकांत भाऊसाहेब पवार 19 ) दादासाहेब बाबासाहेब घोरपडे 20) अशोक भागवत घोरपडे 21 ) सोपान काकोबा निर्मळ 22) रवि सोपान निर्मळ 23) गणेश अशोक निर्मळ 24 ) सागर रावसाहेब मोरे 25) गणेश सुर्यभान निर्मळ 26) सचिन उत्तमराव निर्मळ (मेजर ) 27 ) दिलीप भागावत पारखे 28) नंदु पोपट पारखे 29) शेखर शदर पारखे 30) सुधीर रंगनाथ पारखे 31 ) मनोज मारुती पारखे 32) बाळासाहेब मुरलीधर पारखे 33) अर्जुन एकनाथ इल्ले 34 ) दिपक प्रकाश पारखे 35) भाऊसाहेब रावसाहेब दारुवाले 36 ) आदित्य भाऊसाहेब दारुवाले 37) प्रकाश लक्ष्मण पारखे 38 ) शिवनाथ रेवाजी घोरपडे यांची पत्नी 39) संजय शिवाजी कदम यांची पत्नी 40 ) कैलास धोंडीराम घोरपडे यांची पत्नी 41) संदीप गोरक्षनाथ घोरपडे यांची पत्नी 42 ) कैलास सोन्याबापु घोरपडे याची पत्नी 43) नितीन बाबासाहेब घोरपडे यांची पत्नी 44 ) दिपक रघुनाथ निर्मळ यांची पत्नी 45 ) बाळासाहेब रघुनाथ निर्मळ यांची पत्नी 46) रमाकांत भाऊसाहेब पवार यांची पत्नी 47) दादासाहेब बाबासाहेब घोरपडे याची पत्नी 48 ) अशोक भागवत घोरपडे याची पत्नी 49 ) सोपान काकोबा निर्मळ याची पत्नी 50) रवि सोपान निर्मळ याची पत्नी 51 ) गणेश अशोक निर्मळ याची पत्नी 52 ) मिनाक्षी भिमराज निर्मळ 53) सोमनाथ वसंत निर्मळ 54) पोपट आप्पासाहेब निर्मळ 55) अर्जुन विठठल निर्मळ 56) अशोक भानुदास निर्मळ 57 ) सुनिल विठठल निर्मळ 58) आशीष चंद्रभान निर्मळ 59) रवि नामदेव घोरपडे 57) संदीप विठठल घोरपडे 58) योगेश ज्ञानदेव घोरपडे 59 ) विशाल कांतीराम निर्मळ 60) उमेश चांगदेव घोरपडे 61) सुरज बाळासाहेब निर्मळ 62) विकास बाळकृष्ण निर्मळ 63) महेश बाळासाहेब निर्मळ 64 ) दिपक जालींदर निर्मळ 65 ) मेहश आण्णासाहेब निर्मळ 66
) दिपक जगन्नाथ घोरपडे 67) अभिजित भिमराज निर्मळ 68) निखील प्रकाश निर्मळ व इतर 40 ते 50 लोक व अंदाजे 10 बाया सर्व रा. निर्मळपिंप्री ता. राहाता
असे सर्वजण एकत्रीत जमुन माझे घरासमोर येऊन लताबाई बाळासाहेब निर्मळ व वनिता सोमनाथ घोरपडे या बाया मला शिवीगाळ करुन म्हणाल्या की तुझ्या मुलाने शिवीगाळ करुन बोलून दाखवले मात्र मी तुझ्यासाठी माणसे घेऊन आले आहे तसेच तुम्ही महार तर महार व वरुन लई माजले व गावाचे बोकांडी बसले आहेत असे म्हणुन शिवीगाळ करुन त्या गर्दीतील वनिता सोमनाथ घोरपडे व शुभमं विलास घोरपडे व सोमनाथ सुर्यभान घोरपडे हे माझे घरात घुसुन टीव्ही उचलुन बाहेर फेकला व घरातील तीन गव्हाचे पोते बाहेर फेकले तेंव्हा समोरील गर्दी पाहुन व गर्दीचा आवाज ऐकुन माझे घरातील लोक व माझी बहीण शकुंतला विलास कोळगे हीचे घरातील लोक असे आम्ही आमचे घरात येऊन आमचे घराचे दार लाऊन घेतले त्यानंतर जमलेल्या लोकांनी दरवाजावर लाथा मारुन घरावर दगडफेक केली तसेच आमचे घराचे पाठीमागील शेळयाचे पत्र्याचे शेडनेटचे गर्दीतील लोकांनी नेट पेटुन दिले ते आम्हाला खिडकीतुन दिसत होते त्याचवेळी पोलीस आमचे जवळ आले त्यांनी जमलेला जमाव पांगविला त्यावेळी आम्ही बाहेर आलो त्यावेळी त्या आलेल्या लोकांनी माझे घरासमोरील पाण्याची टाकी फोडलेली होती तसेच घरासमोर असलेल्या गादया पलंग फेकुन दिलेले होते तसेच घरासमोरील असलेले शेड पाडलेले होते व घराचे पत्रयावर व समोर फेकलेले दगड पडलेले होते तसेच माझा पुतण्या करण विलास कोळगे याचे घरासमोरील टाटा मॅजीक गाडी पलटी करुन दिलेली होती तसेच मोटार सायकल पाडुन दिलेल्या होत्या लाईटचे पोल पाडुन दिलेले होते तसेच कपडे फेकुन दिलेले
होते .
तसेच घरातील वापराचे भांडयाचे फोडुन नुकसान केलेले होते त्यानंतर जमाव तेथुन निघुण जातांनी शिवीगाळ करत मंदीराचे दिशेन निघुण गेला. गर्दी आमचे घरासमोर आली त्यावेळी गर्दीतील सोमनाथ सुर्यभान घोरपडे व शुभमं विलास घोरपडे यांनी माझी नात तनुश्री सुशील कोळगे वय 12 हीचे पोटात लाथा मारल्या त्यामुळे ती बेशुध्द झाली होती तसेच माझी मुलगी सुजाता शैलेंद्र
गायकवाड हीला देखील मारहाण होऊन तिचे गळयातील मंगळसुत्र मारहाणीत तुटले आहे व सापडलेले नाही. त्यानंतर आम्ही माझी नात तनुश्री सुशिल कोळगे हीस उपचार करुन तक्रार देण्यासाठी आले आहे.
तरी दिनांक 06/12/2023 रोजी सायंकाळी 06/30 वा चे सुमारास माझा मुलगा विशाल सुधाकर कोळगे याने फोनवर बोलुन शिवीगाळ केल्याचे रागातुन वरील सर्वजण यांनी एकत्रीत येऊन तुम्ही महार तर महार व वरुन लई माजले व गावाचे बोकांडी बसले आहेत असे म्हणुन शिवीगाळ करुन
माझे घरात घुसुन घरातील सामानाची फेकाफेक व तोडफोड करुन घराचे समोरील शेड पाडुन व घरामागील शेड पेटवुन देऊन घरातील मला तसेच इतरांना मारहाण करुन घरातील सामान रस्त्यावर फेकुन देऊन नुकसान केले आहे तसेच माझी बहीण शकुंतला विलास कोळगे हीचे घरासमोर जाऊन तीचे घरासमोरील वाहने पलटी करुन,
पोल तसेच पाण्याचे टाक्या फोडुन नुकसान केले असुन कपडयांची फेकाफेक केली आहे तसेच सोमनाथ सुर्यभान घोरपडे व शुभमं विलास घोरपडे यांनी माझी नात तनुश्री सुशिल कोळगे हीचे पोटात लाथा मारल्या असुन माझी मुलगी सुजाता शैलेंद्र गायकवाड
हीला देखील मारहाण केली असुन मारहाणी वेळी तिचे गळयातील मंगळसुत्र तुटुन पडले आहे म्हणुन माझी वरील सर्व लोकांविरुध्द कायदेशीर फिर्याद
दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी प्रत्यक्ष भेट दिली. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये. शांतता राखावी. कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही. कायदेशीर कारवाई सुरू आहे. कोणत्याही अंफवावर विश्वास ठेवू नये. असे आवाहनही शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी केले आहे.