Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

पोटच्या मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या पुणे शहरातील नराधम बापाला एक महिन्यानंतर शिर्डी साईबाबा संस्थानच्या सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेने अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

शिर्डी प्रतिनिधि
पीडित मुलगी सात महिन्यांची गरोदर असल्याचं तिच्या आईच्या लक्षात आल्यानंतर १० नोव्हेंबर रोजी वानवडी पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने आरोपी पती विरुद्ध तक्रार दिली होती. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून वानवडी पोलिसांनी आरोपी बापाविरोधात भादंवि कलम ३७६ /२ आणि बाल लैंगिक अपराध संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत
आरोपीचा शोध सुरू केला होता. गेल्या काही दिवसांपासून आरोपी राजस्थान, गुजरात आणि बंगळुरु येथे फिरला. अखेर त्यानं महाराष्ट्रात परतत साईबाबांच्या
शिर्डीत आश्रय घेतला. साईबाबा संस्थानच्या साई उद्यान इमारतीत गेल्या २६ डिसेंबरपासून एक लॉकर भाड्याने घेत आरोपी राहत होता. मात्र, गुरुवारी लॉकरची मुदत संपूनही तो आरोपी लॉकर खाली करत नव्हता. त्याच्या वागण्याबद्दल संशय आल्यानं साई उद्यान इमारत प्रमुखांनी साईबाबा संस्थानचे सुरक्षा प्रमुख आण्णासाहेब परदेशी यांना माहिती दिली.
अधिकारी अण्णासाहेब परदेशी आपल्या सुरक्षा रक्षकांसह घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आरोपीकडे असलेली बॅग चेक केली गेली. यावेळी बॅगमध्ये मोबाईल क्रमांक आढळून आला. या मोबाईल क्रमांकवर संपर्क साधल्यानंतर आरोपीच्या पत्नीने घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती दिली. यानंतर साईबाबा संस्थानचे सुरक्षा अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांनी या आरोपीला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले. शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी या आरोपी बाबद पुणे वानवडी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर पोटच्या मुलीवर बलात्कार करून फरार झाला
असल्याचं आरोपीबाबत निष्पन्न झालंय. वानवडी पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून
आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेवर पोटच्या बापाने गेल्या एप्रिल महिन्यापासून वारंवार बलात्कार करून तिला गरोदर केले होते. आरोपी २६ डिसेंबरपासून
शिर्डीतील साई उद्यान येथे राहत होता. त्याला वारंवार रूम खाली करण्यास सांगूनही तो करत नसल्याने त्याच्या वर्तणुकीवर संशय
आला. अखेर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्या कुकृत्याचा भंडाफोड झाला

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button