Letest News
शिर्डीत मध्यरात्री संशयास्पद हालचाली दुचाकीसह दोघे पोलिसांच्या जाळ्यात! संकटात साई संस्थान ठरले आधारवड!कर्मचाऱ्यास अपघात विम्यापोटी साडेतीन लाखांची मदत पर्युषण महापर्वानिमित्त जिल्ह्यातील कत्तलखाने मांस विक्री केंद्रे बंद जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया य... चाकूचा धाक दाखवून तरुणीला घेऊन पसार! भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण रोशन घेगडमलसह दोघांविरुद्ध तक्रार प्रवीणभाऊ आल्हाट यांची मानवाधिकार असोसिएशनच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती थरावर थर… कौशल्याचा कहर! शिर्डीत सनमित्र-क्रांतीच्या दहीहंडीचा पुन्हा एकदा जल्लोष अहिल्यानगरचा डाग पुसण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची धडपड शिर्डीतील काही पोलिसांमुळे प्रयत्नांना तिलांजल... ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं...
क्राईमशिर्डी

अवैध वाहतूक अवैध धंदे यांच्यावर कडक कारवाई! फेरीवाले पथविक्रेते कमिशन एजंट यांचीही धरपकड!

शिर्डी( प्रतिनिधी )
शिर्डी येथे नुकतेच दुहेरी हत्याकांड घडले त्यानंतर शिर्डी मध्ये अवैध धंदे , अवैध वाहतूक यांच्यावर प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून फेरीवाले, पथ विक्रेते, कमिशन एजंट यांची धरपकड होत आहे.
शिर्डी हे श्री साईबाबांमुळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झाले आहे. येथे दररोज हजारोंच्या संख्येने साईभक्त देश-विदेशातून साई दर्शनासाठी येत असतात.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

साईभक्त येथे आल्यानंतर साई भक्तांना रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड येथून किंवा निवासस्थानाकडे जाण्यासाठी प्रसादालयाकडे जाण्यासाठी अपे रिक्षा तसेच येथे प्रवासी वाहतूक करणारी अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतोच. परंतु साई भक्तांची आर्थिक लुटमारही होते.

त्याचप्रमाणे विना नंबर प्लेट वाहने रस्त्याने अनेकदा दिसून येतात. येथे धूम स्टाईल महिलांच्या गळ्यातील सोन्याची दागिने पळविण्याचे प्रकारही वाढले आहेत. विना नंबर मोटरसायकलवर धूम स्टाईल येऊन असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने विना नंबर प्लेट वाहने, अवैध वाहतूक तसेच अवैध धंदे यांच्यावर कडक कारवाई सुरू केली आहे. त्याचप्रमाणे शिर्डी शहरात रस्त्यांवर फुटपाथवर पथ विक्रेते, विविध वस्तू विकणारे फेरीवाले, कमिशन एजंट व संशयित फिरणारे यांचीही धरपकड सुरू केली आहे.


शिर्डीत दुहेरी हत्याकांड घडल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये शिर्डीतील कायदा व सुव्यवस्था या विषयीची चर्चा सुरू झाली. त्यामुळे प्रशासनाने ही येथे अवैध धंद्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. मात्र ही कारवाई तात्पुरती न ठेवता कायमस्वरूपी अशी कारवाई राहावी. अवैध धंदे अवैध वाहतूक बंदी, व फेरीवाले, कमिशन एजंट , धरपकड मोहीम काही काळ मर्यादित न राहता कायमस्वरूपी व सातत्याने रहावी.

जेणेकरून येथे अवैध धंदे, अवैध वाहतूक व कमिशन एजंट ,फेरीवाले यांचा बंदोबस्त होईल. अवैध धंदे बंद झाल्यानंतर गुन्हेगारीही कमी होईल. शांतता सुव्यवस्था अबाधित राहील असा प्रयत्न व्हावा अशी मागणी साईभक्त, ग्रामस्थांकडून होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button