Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
क्राईमशिर्डी

श्री साईबाबा संस्थानच्या तत्कालीन कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी स्वतः दिव्यांग अर्थात कर्नबधिर असल्याचा दाखला हा संशयास्पद पत्रकार राजेंद्र भुजबळ 

शिर्डी प्रतिनिधी/ 

sai nirman
जाहिरात

आपल्या देशातील आय ए एस या पदवीला देशात सर्वोच्च स्थान आहे. या परीक्षेला एक खास वलयं असून या परीक्षेच्या आधारावर अनेक तरुण, तरुणी  मेहनत, अभ्यास, आणि संघर्षांच्या जोरावर उत्तीर्ण होऊन आपल्या देशाची सेवा करत आहे. त्यापैकी या सेवेत आपल्या देशात अनेक दिव्यांग बांधव, भगिनी सेवा देत आहेत अर्थात दिव्यांग हा घटक आपल्या देशात शेवटचा व महत्वपूर्ण मानला जात असून त्यांच्यासाठी देशात सर्वच क्षेत्रात विशेष सवलती आहेत. याचाच गौरफायदा घेत शिर्डी साई संस्थांनच्या तत्कालीन   आय ए एस असल्याल्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी स्वतः दिव्यांग अर्थात कर्नबधिर असल्याचा दाखला पुणे येथील बी जे मेडिकल कॉलेज मधून घेऊन त्या आय ए एस  झाल्या आहेत परंतु त्यांच्या या प्रमाणपत्रावर दिल्ली येथील एम्स या प्रख्यात इन्शुटूट येथे सस्पेकटेड केस अर्थात संशयास्पद हा अभिप्राय नोंदविला आहे. तरी सुद्धा त्या नागालँड कॅडर मधून आय ए एस झाल्या होत्या, विशेष बाब म्हणजे त्यांनी आय ए एस पदवी बहाल केल्यानंतर वशिला आणि पैशाच्या जोरावर नागालँड मधून थेट महाराष्ट्र राज्यात बदली करून घेतली, अर्थात कायाद्यानुसार ही बदली करताना केंद्र शासनाच्या वेबसाईटवर आपली सर्व माहिती देणे अनिवार्य असताना त्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून आपली सेवा कायम ठेवली. अर्थात शिर्डी येथील त्यांचा वादग्रस्त कार्यकाल व राजेंद्र भुजबळ यांनी उठविलेल्या सत्याचा आवाजाचा त्यांना राग आला व त्यांनी एक दिवस  राजेंद्र भुजबळ  वर 353 सारखा खोटा गुन्हा नोंदविण्यास पोलीस प्रशासनावर दबाव आणला, अखेर तो गुन्हा खोटा असल्याचा पोलीस तपासात सिद्धही झालं असल्याचे पत्रकार  राजेंद्र भुजबळ यांनी सांगितले

 राजेंद्र भुजबळ यांनी पुढे सांगताना म्हणाले कि सध्या पूजा खेडकर हे प्रकरण देशभर गाजत असले तरी, श्रीमती भाग्यश्री बानायात हे प्रकरण सुद्धा त्याच प्रकारचे असून याविषयी मी रीतसर तक्रार पुराव्यासह राज्यशासन व केंद्रशासन यांच्याकडे केली असून त्याचाच परिपाक म्हणून त्यांना पुन्हा राज्याबाहेर पाठविले असले तरी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावर ज्यांनी देशाची फसवणूक करून मूळ दिव्यांग बंधू, भगिनीवर अन्याय केला आहे, अशा स्वार्थी, बोगस आणि गद्दार अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही अर्थात संविधानाने दिलेला अधिकार आज मी पणाला लावला असून लवकरच पूजा खेडकर नंतर दुसऱ्या अध्यायाची  सुरवात होणार आहे. पत्रकार राजेंद्र भुजबळ यांनी इशारा दिला आहे 

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button