Letest News
शिर्डीत मध्यरात्री संशयास्पद हालचाली दुचाकीसह दोघे पोलिसांच्या जाळ्यात! संकटात साई संस्थान ठरले आधारवड!कर्मचाऱ्यास अपघात विम्यापोटी साडेतीन लाखांची मदत पर्युषण महापर्वानिमित्त जिल्ह्यातील कत्तलखाने मांस विक्री केंद्रे बंद जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया य... चाकूचा धाक दाखवून तरुणीला घेऊन पसार! भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण रोशन घेगडमलसह दोघांविरुद्ध तक्रार प्रवीणभाऊ आल्हाट यांची मानवाधिकार असोसिएशनच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती थरावर थर… कौशल्याचा कहर! शिर्डीत सनमित्र-क्रांतीच्या दहीहंडीचा पुन्हा एकदा जल्लोष अहिल्यानगरचा डाग पुसण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची धडपड शिर्डीतील काही पोलिसांमुळे प्रयत्नांना तिलांजल... ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं...
क्राईमशिर्डी

दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

शिर्डी (प्रतिनिधी) : राहाता तालुक्यातील निमगाव येथे चोरट्यांनी पुन्हा एकदा धाडसी कृत्य करत दिवसाढवळ्या घरफोडी केली. घराचे मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटातील लॉकर फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले. या घटनेमुळे निमगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश भाऊसाहेब गाडेकर (रा. निमगाव, ता. राहाता) यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे श्री साईबाबा संस्थानमध्ये नोकरीस असून, त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरावर पाळत ठेवून ही चोरी केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाट उघडून लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने लबाडीच्या उद्देशाने चोरून नेले. चोरीस गेलेल्या मालाची किंमत सुमारे ₹४ हजार असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६७८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ अन्वये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक गलांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दातीर करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांची हालचाल तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.


गेल्या काही दिवसांपासून शिर्डी व राहाता तालुक्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी घर बंद ठेवताना अधिक खबरदारी घ्यावी, तसेच संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button