Letest News
शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन
Blog

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते शाहरुख खान शिर्डीत श्री साईबाबा चरणी लीन!

शिर्डी (प्रतिनिधी) सध्याचा प्रसिद्ध बॉलिवूड किंगखान,व ज्येष्ठ अभिनेता शाहरुख खान आपली मुलीसह आज गुरुवारी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या चरणी लीन झाला. शाहरुख खान यांनी श्री साई समाधी मंदिरात जाऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. सन २०२३ हे वर्ष शाहरुखसाठी खास ठरलं आहे .या वर्षातील त्याचे पठाण आणि जवान हे दोन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले. पठाण आणि जवान हे दोन्ही सिनेमे प्रदर्शित होण्याआधी शाहरुखने श्री साईबाबांना मनोभावे प्रार्थना केली होती.आता शाहरुखचा आगामी डंकी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधी तो शिर्डीत पोहोचला व त्याने श्री साईबाबा समाधी मंदिरात जाऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. शाहरुख खान यांच्याबरोबर त्यांची मुलगी व या डंकी चित्रपटातील एक कलाकार त्यांच्या समवेत होते.त्याने साईंचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


श्री साईबाबा संस्थांनच्या वतीने त्यांचा शाल श्री साई मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. आगामी डंकी चित्रपट चांगला चालू द्या! असे मनोमन प्रार्थना करत त्याने श्री साईबाबा चरणी साकडे घातले.
प्रसिद्ध सिने अभिनेता शाहरुख खान शिर्डीत साई दर्शनाला आल्याचे चहात्यांना समजताच त्यांनी शाहरुख खान यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. साई भक्त ,ग्रामस्थही यावेळी शाहरुख खानला हात हालवून अभिवादन करीत होते. शाहरुख खान शिर्डीत आल्यानंतर कडेकोट बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button