Letest News
“दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे
क्राईमशिर्डी

दैनिक साईदर्शनने शिर्डीतील लाखो रुपयांचा गुटखा विक्रीचा केला पर्दाफाश!

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी येथील भर लोक वस्तीवर होलसेल गुटखा विक्री सुरु असल्याची दैनिक साईदर्शनला माहिती मिळताच संपादक जितेश लोकचंदानी यांनी स्वतः गुटखा विक्री सुरु असल्याची माहिती नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे साहेबांना फोन लावून ज्यांठिकाणी राजरोसपणे गुटखा विक्री सुरु असल्याची माहिती दिली

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

आणि कराळे साहेबांनी त्यांच्या पथकातील येवलाचे पोलीस निरीक्षक यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले .परंतु ह्या गुटखा तस्करला याचा सुगावा लागताच त्याने माल हलवायला सुरु केले असता लोकचंदानी यांनी तात्काळ 112 ला कॉल करून या अवैद्यरित्या साठवलेल्या गुटखाची माहिती दिली असता शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी आले

आणि गुटखा विकणाऱ्यास रंगेहाथ पकडले . ज्यांठिकाणी हा गुटखा साठा करून ठेवला होता ते घर आशिष खाबिया यांचा आहे. ह्याच खाबियावर अनेकदा रेड झालेली आहे अनेकदा गुटखा विक्री प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे तरीही हा राजरोसपने गुटखा विक्री करीत होता

म्हणून नागरिकांमध्ये चर्चा होती कि इतके गुन्हे दाखल होऊन सुद्धा हा गुटखा विक्री करणारा खाबिया याच्यावर नेमके कोणाचा वरदहस्त आहे.असा प्रश्न उपस्तिथ केला जातं होता तशी काल घटनास्थळी चर्चा होती कि हा माल रवी कर्डीलेचे असून संदीप चव्हाण आणि आशिष खाबिया हे एकत्र व्यवसाय करतात असे बोलले जात आहे

अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे . ज्याठिकाणी हा गुटखा विक्री होत आहे ते भरवस्तीत आहे .पोलीसांनी घराची झडती घेतली असता 26 पोते आणि 11 बॉक्स गुटखा सापडला आहे त्यात विमल, रजनीगंधा, हिरा डायरेक्टर ,राजश्री, तुलसी असे अनेक प्रकारचे गुटखे आहेत ज्याठिकाणी हा गुटखा विक्री सुरु होता

तो आशिष खाबिया याचे घर आहे त्या घरात त्याचे कुटुंबीय रहायला आहे भर वस्तीत असे प्रकार चालत असतांना आजू बाजू चे लोक का गप्प बसतात, हा एक चिंतेचा विषय आहे काल अन्न व भेसळक विभागाचे अधिकारी आणि शिर्डी पोलीसांनी माल जप्त करून गुन्हा दाखल केलेला आहे व खाबियास अटक केलेली आहे दैनिक साईदर्शन ह्यापुढेही अश्या दोन नंबर धंदा करणाऱ्यांचा पर्दाफाश करणार आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button