Letest News
चेंबूर के साईभक्त प्रताप गंगवानी और शिर्डीके सुपुत्र राजेश टिक्यानी शोभा राजेश जाधवानी इनके श्रमसे स... ह.भ.प. संगीताताई पवार यांची हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचं स्पष्ट चार संशयित आरोपींना अटक चेंबूर येथील प्रकाश गंगवाणी व शिर्डी येथील राजेश टिक्यानी शोभा राजेश जाधवानी यांच्या प्रयत्नाने श्री... निमगाव येथील पतसंस्थेच्या पैश्यांचा अपहर करणाऱ्या त्या संचालकांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढवणार-सहकार खा... शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महसूल समाधान शिबिरात १३६ दाखल्यांचे वाटप नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उल्हासनगरच्या विजयचे शिर्डी येथून अपहरण वडिलांनी शिर्डी पोलीस स्टेशनला केला गुन्हा दाखल आर बी एल चौकात हाईट ब्यारिगेटला ट्रकची धडक सुदैवाने कोणास इजा नाही  आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईन मध्ये मोरीचे घाण पाणी सोडल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल  साईभक्ताची सापडलेली पर्स संस्थान कर्मचारी यांनी केली परत संस्थान कडून त्या कर्मचारीचे सन्मान
अ.नगरक्राईम

राकेश ओला यांचा पापाचा घडा भरला कि काय? आधीच एक अति संवेदनशील गुन्हा प्रलंबित असतांना पोलीस अधीक्षकांना लागली मकासारे नावाची साडेसाती

अहिल्यानगर (प्रतिनिधी) रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील प्रमुख सरकारी साक्षीदार विजय मकासरे अनुसूचित जातीचे असल्याचे माहित असतानाही संगणमताने न्यायालया समोर बदनामी केली व न्यायालयाला खोटी माहिती दिली व मानसिक त्रास दिला. त्यामुळे विजय मकासरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील अनिल ढगे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी अंतर्गत ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

व राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल गृहमंत्री पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक व अनुसूचित जाती जमाती आयोग जिल्हाधिकारी आदींना त्याच्या प्रति पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील प्रमुख सरकारी साक्षीदार वळण ता. राहुरी येथील विजय मकासरे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी मा. जिल्हा न्यायालयाने अहिल्यानगर मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी साक्षीदार मकासरे यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले होते.

तथापी जिल्हा न्यायालयाचे आदेश झाल्यानंतर ,पोलीस अधीक्षक ओला यांनी जिल्हा न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी विजय मकासरे यांना एक दिवस पोलीस संरक्षण दिले. व न्यायालयाला लेखी पत्र देऊन विजय मकासरे हे गुन्हेगार असल्याचे सांगून मकासरे यांची प्रतिमा मलीन केली तसेच त्यांचेवर अनुक्रमे सात गुन्हे दाखल असल्याची खोटी माहिती देवुन त्यांचे चारित्र्य हनन केले. व मकासरे यांच्याबाबत जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील अनिल ढगे यांचे मार्फत सदर खोटी माहिती न्यायालयासमोर सादर केली.

व विजय मकासरे यांची न्यायालयात बदनामी घडवून आणली.
वास्तविक पाहता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मे न्यायालयात सादर केलेल्या पत्रातील मकासरे यांचेवरीत काही गुन्हे न्यायालयाने निकाली काढले असून काही गुन्हे न्यायप्रविष्ठ असताना आणि मकासरे यांचे विरोधात कोणताही गुन्हा अद्याप शाबित होऊन त्यांना शिक्षा झाली नसताना त्यांचा गुन्हेगार असा उल्लेख करून निकाली निघालेल्या गुन्ह्यांची खोटी माहिती में न्यायालयात
सादर करून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी न्यायालयाची दिशाभूल केली आहे.

सरकारी वकील अनिल ढगे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या माहितीची कोणत्याही प्रकारे शहानिशा न करता ती माहिती न्यायालयासमोर सादर केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि सरकारी वकील अनिल ढगे यांनी मी अनुसूचित जातीचा असल्याचे माहित असतानाही संगणमताने मे. न्यायालयासमोर माझी बदनामी करून व मे न्यायालयाला खोटी माहिती देऊन मला मानसिक त्रास दिला आहे.

असे विजय मकासरे यांनी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार न्यायालयाला खोटी माहिती देऊन मकासरे यांच्याबाबत न्यायालयाने दिलेले संरक्षण पुरविण्याचे आदेश रद्द करण्यास न्यायलयाला उद्युक्त केल्याबद्दल मकासरे यांनी उपरोक्त कायद्यातील तरतुदी अन्वये जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील अनिल ढगे यांचे विरोधात अट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी अंतर्गत ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे.


सदर तक्रारीच्या प्रती मकासरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, तसेच गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, व अनुसूचित जाती जमाती आयोग, समाज कल्याण संचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आदींना पाठवल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

डॉक्टर विजय मकासरे यांच्या वतीने अँड. सुरेश लगड अँड. आनंद सूर्यवंशी अँड. शौकत शेख अँड. स्वाती जाधव अँड. निंबाळकर हे कामकाज पाहत आहेत व पॉस्को अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याचे काम जेष्ठ न्यायविधी तज्ञ् वैभव पवार काम पाहात आहेत 

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button