Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
अ.नगरराजकीय

शिंदेचा एन्काऊंटर केला. दुसऱ्या शिंदेंचा जनता एन्काऊंटर करेल पोलीस इतके लेचेपेचे असतील तर फडणवीसांनी राजीनामा द्यायला हवा राऊत

एकाचं एन्काऊंटर झाला, आता दुसऱ्या शिंदेंचा जनता एन्काऊंटर करेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या एन्काऊंटरबाबत बोलताना संजय राऊत यांनी हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असल्याचं म्हटलं.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

तसंच या प्रकरणात मोठे मासे वाचवायचे आहेत, ज्यांना वाचवायचं आहे ते भाजपशी संबंधित आहेत.बदलापूरमध्ये हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली होती. संपूर्ण जनता आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, त्याला फाशी व्हावी या मागणीसाठी रस्त्यावर उतरली होती. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, बदलापूरमधील जनतेने रेल्वे बंद पाडली होती, रस्ते बदं केले होते. आरोपीला आमच्या ताब्यात द्या,

kamlakar

आम्ही त्याला शिक्षा देऊ, फासावर लटकवू असं म्हणत त्याला आमच्याकडे सोपवण्याची मागणी केली होती. पण त्यावेळी मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी महाराष्ट्र कायदेशीर राज्य असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं आश्वासन दिलं होतं, असंही संजय राऊत म्हणाले.पोलीस व्हॅनमध्ये बसलेला बुरखा घातलेला आणि बेड्यांनी जखडलेला गुन्हेगार पळून कसा जाईल,

तो पोलिसांच्या कमरेवरील पिस्तूल कसं काढू शकतो असा सवाल करत संजय राऊत यांनी आमचे पोलीस इतके लेचेपेचे असतील तर फडणवीसांनी राजीनामा द्यायला हवा, असं म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात जे वातावरण निर्माण केलं आहे, त्यावरुन लक्ष हटवणयासाठी हे एन्काऊंटर केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button