Letest News
स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची मोठी कारवाई 120 किलो 905 ग्रॅम वजनाचे गांजासह एकुण 80,83,464/- रुपय... पत्रकारीता क्षेत्रात शौकतभाई शेख म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्... मागील भांडणाच्या कारणावरून एका कुविख्यात गुंड्याने केले गोळीबार श्रीरामपूर शहर हादरले  थायलंड येथे झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धा मध्ये शिर्डी चा निलेश वाडेकर याने मिळवले ब्रांझ मेडल कोट्यावधिचे मुद्देमाल जप्त करत नगर गुन्हे अन्वेषण पथकाने केली कामगीरी भारी !! शरद पवारास जिल्हाधिकारी साहेबांचा चांगलाच हिसका ! शेतकऱ्याचा चोरीस गेलेला जेसीबी मोठया शिताफिने हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई कोयता व सुऱ्याचा धाक दाखवुन लुटमार करणाऱ्या दोन टोळयांमधील 4 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद शिर्डी वाहतूक शाखेकडून नाकाबंदी करून कारवाई पोलीस निरीक्षक महेश येसेकर देह व्यापार रोखण्यासाठी पोलिसांनी केले चार हॉटेल सील हॉटेल् सील झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ
अ.नगरशिर्डी

शिर्डी भाजपाच्या शहराध्यक्षपदी रवी गोंदकर यांची नियुक्ती!

शिर्डी (प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी शहर भाजपाच्या शहराध्यक्षपदी
भारतीय जनता पक्षाचे तरुण तडफदार कार्यकर्ते रवी गोंदकर यांची नुकतीच निवड करण्यात आली. यानिमित्ताने त्यांचा शिर्डी येथे सत्कार करण्यात आला. तसेच त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. शिर्डी येथील भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते रवी गोंदकर यांनी

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहर भाजपा प्रत्येक घरोघरी जाऊन भाजपाच्या संघटन व पक्ष वाढीवर भर देण्यासाठी मोठे प्रयत्न केले.व ते करत आहेत. त्याची दखल घेऊन त्यांना भाजपाच्या शहराध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्ती बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रवी गोंदकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की,

भारतीय जनता पक्षाची विचारधारा शहरातील समाजातील सर्व स्तरा पर्यंत पोहोचविणार असल्याचा तसेच कार्यकर्त्यांचे विश्वातील सर्वात मोठे संघटन असलेल्या भारतीय जनता पक्षाला आणखी मजबुत करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त करत केंद्र व राज्य शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना तसेच विकासाचे अनेक प्रकल्प राज्यात व देशात सुरु आहेत.

गोरगरीब व सर्वसामान्यांसाठी असणा-या अशा सर्व विकास योजना व विकास प्रकल्पांची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नूतन शिर्डी शहर भाजपा शहर अध्यक्ष रवी गोंदकर यांचा कार्यकर्त्यांनी व पदाधिका-यांनी आयोजित सत्कार समारंभास भाजपाचे उत्तर नगर जिल्हा कार्याध्यक्ष नितीन दिनकर, मा. उपनगराध्यक्ष अभयराजे शेळके

अशोक पवार, किरण बोराडे, नरेश सुराणा, योगेश गोंदकर, नितीन शेजवळ, संपत जाधव, शाहरुख पठाण,सचिन काटकर, अनिल त्रिभुवन, समाधान बनकर, अजय सदाफळ, विशाल अहिरे, सागर पवार, विश्वजीत वाघ, गणेश सोनवणे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी नवनिर्वाचित शहर अध्यक्षांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रवी गोंदकर यांनी ना. राधाकृष्ण विखे पाटील

आणि मा.खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डी शहर भारतीय जनता पक्षाचा शिर्डी शहर अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे व उपस्थित सर्व पदाधिका-यांचेही यावेळी आभार मानले. या कार्यक्रमाला भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button