Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीयशिर्डी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लोकसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रांची सरमिसळ

अहमदनगर दि. 10 एप्रिल (जि.मा.का.): जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठो जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्ह्यातील 3 हजार 734 मतदान केंद्रांसाठी द्यावयाच्या मतदान यंत्रांची जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रकिया करण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहूल पाटील, भूसंपादन अधिकारी चंद्रशेखर देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी शैलेश मोरे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी गजानन नकासकर आदी उपस्थित होते.

kamlakar

जिल्ह्यातील 37-अहमदनगर लोकसभा मतदार संघांतर्गत 6 विधानसभा मतदार संघ व 38 शिडी अनुसूचित जाती लोकसभा मतदार संघांतर्गत 6 विधानसभा मतदारसंघ अशा एकुण 12 विधानसभा मतदार संघाच्या आवश्यकतेनुसार 9 हजार 517 बॅलेट युनिट, 5 हजार 194 कंट्रोल युनिट आणि 5 हजार 644 व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली.

अंतिमतः 4478 सीयू, 4478 बीयू व 4850 व्हीव्हीपॅट याचे दोन लोकसभा मतदारसंघतील 12 विधान सभा साठी वाटप करण्यात आले. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.

सरमिसळ प्रक्रियेच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जयंत वाघ, प्रताप शेळके, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राजेंद्र दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अमोल जाधव, भारतीय जनता पक्षाचे सचिन पारखी आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button