Letest News
“राधाकृष्ण विखेंना हटवा…” जरांगेंच्या निर्णायक आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्र्यांना थेट पत्र! संघर्षाच्या वाटेवरून यशाची पहिली पायरी चढला गौरव लोकचंदानी-बार कौन्सिलची सनद मिळवत वकिलीच्या नव्या प... शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर पुण्यातील साईभक्त रामदास तापकीर यांनी अर्पण केला १३ लाख ४२ हजार ९८० रुपये किंमतीचा ९० ग्रॅम सोन्याचा... शिर्डीचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अमोल विठ्ठलराव गंगलवाड चे टोकाचे पाऊल रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्... उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन अहिल्यानगर पोलिस दलात खळबळ! अमली पदार्थ विक्रीकांडात LCBचे माजी प्रमुख कबाडींना मॅटचा दणका नितीन गडकरी ॲक्शन मोडमध्ये- नगर–मनमाड महामार्गाच्या चौकशीसाठी केंद्रीय समिती‘ट्रंप तात्या डांबर देत ...
अ.नगरक्राईम

पोलीस नाईक वाळके यांनी आत्महत्येचा प्रयत्न कशामुळे केला?

शिर्डी( प्रतिनिधी)
शिर्डी येथे एका पोलिसाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र नशीब बलवत्तर म्हणून हा पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावला. मात्र त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? यासंदर्भात आता मोठी चर्चा होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


संगमनेर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस नाईक पदावर काम करत असणारा वाळके नावाचा तरुण पोलीस कर्मचारी हा शिर्डी येथे राहतो. पूर्वी तो शिर्डी पोलीस स्टेशन येथे कार्यरत होता .मात्र त्याची बदली संगमनेर पोलीस स्टेशनला झाली असून तेथे तो सध्या कार्यरत आहे.

पोलीस नाईक वाळके यांनी राहत असणाऱ्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत त्यास श्री साईनाथ सुपर हॉस्पिटल शिर्डी येथे उपचारासाठी दाखल केले त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली त्याची तब्येत आता ठीक आहे. मात्र त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याचा उलगडा आता हळूहळू होऊ लागला आहे.

पोलीस नाईक वाळके यांच्या मोबाईल मध्ये सर्व रेकॉर्डिंग असल्याचे खात्रीशीर माहिती आहे. पोलीस नाईक वाळके व त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग त्यांच्या मोबाईल मध्ये आहे वरिष्ठाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला की काय? अशी शंका आता नागरिकांमधून कुजबुजू लागली आहे.

मात्र नेमकी आत्महत्या करण्याचा प्रयत्न कशावरून केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही त्याचा छडा पोलिसांनी लावावा . अशी मागणी होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button