Letest News
शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम “भोंदू बाबाच्या कुकर्मांनी महाराष्ट्र हादरला-आता मोठ्या लोकांचे धागेदोरे बाहेर येणार?” – अमोल मिटकरी... किशोरी पेडणेकर यांचा शिर्डीत संतापाचा स्फोट! किशोरी पेडणेकर : “कॅप्टनच्या नावाखालील राक्षस उघड करा!” साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ
Blog

अपघातात शिर्डीच्या पंधरा वर्षे वयाच्या साईश विकास शिंदे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे आज शनिवारी सकाळी अपघात होऊन साईश विकास शिंदे या पंधरा वर्षे वय असणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला असून या दुर्दैवी दुःखद घटनेमुळे शिर्डी सह परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

sai nirman
जाहिरात


शिर्डी येथील श्री साईबाबा हॉस्पिटलचे लॅब टेक्निशियन विकास शिंदे यांचे एकुलते एक ‌चिरंजीव साईश विकास शिंदे (वय 15 वर्ष) याचा हेलीपॅड रोडला विजय कोते यांच्या वस्तीजवळ रस्त्यामधील डिव्हायडरला धडकून अपघात होऊन त्यात तो जबर जखमी होऊन मृत्युमुखी पडला. ही घटना शनिवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या दरम्यान घडली.

DN SPORTS

मयत साईश शिंदे हा श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकत होता. त्याच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे शिर्डी व परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मयत साईश विकास शिंदे याच्यावर शनिवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान शिंदे वस्ती शिर्डी येथे मोठ्या शोकाकुल अंतकरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या या निधनाबद्दल अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button