Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
क्राईमशिर्डी

शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आईच्या स्वाधीन पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक

शिर्डी, उप संपादक राजेंद्र गडकरी

sai nirman
जाहिरात

: श्री साईबाबा मंदिर परिसरातून बेपत्ता झालेल्या १२ वर्षीय चिमुरडीचा अवघ्या काही तासांत शोध घेऊन तिला सुखरूप तिच्या आईच्या स्वाधीन करत शिर्डी पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या तत्परतेची प्रचिती दिली आहे. या कारवाईमुळे एका कुटुंबावरील मोठे संकट टळले असून, पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

DN SPORTS

kamlakar

मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादानंतर आई आपल्या दोन मुलींसह शिर्डीत आली होती. २ ऑगस्ट रोजी दुपारी श्री साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ४ परिसरातून १२ वर्षीय गौरी तान्हाजी लहानगे ही अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली. आईने परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध घेतला; मात्र मुलगी न मिळाल्याने शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

तक्रार मिळताच शिर्डी पोलिसांनी वेळ न दवडता शोधमोहीम हाती घेतली. मंदिर परिसर, शहरातील विविध भाग तसेच उपलब्ध तांत्रिक साधनांचा वापर करून कसून शोध घेत अखेर अल्पावधीतच चिमुरडीचा सुखरूप शोध लावण्यात आला. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले.

भाविकांची मोठी गर्दी असलेल्या शिर्डीसारख्या संवेदनशील धार्मिक स्थळी अशा घटनांमध्ये तातडीने प्रतिसाद देत चिमुरडीचा सुखरूप शोध लावल्याबद्दल शिर्डी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे नागरिकांकडून आणि भाविकांकडून कौतुक व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button