Letest News
शिर्डीत हरवलेला ‘आयफोन’ साईभक्तेला परत शिर्डी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी साईचरित्र पारायणाची भक्तिमय सांगता आज सायंकाळी शिर्डीत पोथीची भव्य मिरवणूक साईचरणी कोते-गोंदकर परिवाराची श्रद्धेची लाखमोलाची ओंजळ!श्री साईचरित्र पारायण सोहळ्यासाठी दोन्ही परिव... विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ... डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झाला’- रोहित पवारांचा बोचरा पलटवार उदयपूर ते शिर्डी सातवी पदयात्रा भक्तिभावात पूर्ण- साईभक्त मोहित आचार्य यांचे शिर्डीत आगमन
राजकीयशिर्डी

साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा

शिर्डी नगरीवर आज दुःखाची छाया पसरली आहे. नागरे कुटुंबातील ज्येष्ठ व अत्यंत आदरणीय व्यक्तीमत्त्व सौ. आशालता मनोहर नागरे (वय ७४) यांचे दि. २९ मार्च २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांचे जीवन केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित नव्हते, तर ते शिर्डीच्या पवित्र इतिहासाशी जोडलेले होते. साईबाबांना “साई” हे नाव देणारे महान भक्त म्हाळसापति यांच्या घराण्यातील त्या सुन होत्या. त्यामुळे त्यांच्या जाण्याने जणू साईभक्तीच्या इतिहासातील एक जिवंत दुवा कायमचा हरपला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


आशालता ताई म्हणजे मायेचा सागर, प्रेमाचा झरा आणि संस्कारांची शिदोरी होत्या. त्यांच्या शब्दांत आपुलकी होती, त्यांच्या हास्यात समाधान होतं आणि त्यांच्या उपस्थितीत घराला घरपण मिळायचं. त्यांनी आयुष्यभर साधेपणा, श्रद्धा आणि सेवाभाव जपला. त्यांच्या हातून अनेकांना आधार, प्रेम आणि आशीर्वाद मिळाले.
आज त्या आपल्यात नाहीत, ही गोष्ट मनाला पचनी पडत नाही…
घरातील मायेची सावली हरपली, कुटुंबाचा आधारवड कोसळला…
त्यांची अंत्ययात्रा आज, दि. २९ मार्च २०२६ रोजी सकाळी नागरे वस्ती, पानमळा, शिर्डी येथून निघून सकाळी ११.०० वाजता शिर्डी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


🙏 शोकाकुल कुटुंबीय 🙏
श्री. दिपक मनोहर नागरे (मुलगा)
श्री. अजय मनोहर नागरे (मुलगा)
श्री. संदिप मनोहर नागरे (मुलगा)
श्री. निलेश मनोहर नागरे (मुलगा)
श्री. अशोक मार्तंड नागरे (दिर)
श्री. श्रीकांत अशोक नागरे (पुतण्या)
समस्त नागरे परिवार, शिर्डी
या दुःखद प्रसंगी संपूर्ण शिर्डी नगरी नागरे कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाली आहे.


ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो…
त्यांच्या आठवणी सदैव हृदयात जिवंत राहतील…
ॐ शांती… शांती… शांती… 🙏🌹दैनिक साई दर्शन परिवार कडून भावपूर्ण श्रद्धांजली 🌹
सौ. आशालता मनोहर नागरे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. साईभक्तीच्या पवित्र परंपरेशी जोडलेली ही महान व्यक्ती हरपल्याने शिर्डी नगरीवर शोककळा पसरली आहे.


साईबाबांना “साई” हे नाव देणारे भक्त म्हाळसापति यांच्या घराण्याशी असलेले त्यांचे नाते हे केवळ कुटुंबापुरते मर्यादित नसून, संपूर्ण साईभक्तांसाठी अभिमानाची बाब होती. त्यांच्या जाण्याने एक जिवंत परंपरा, एक मायेची सावली आणि एक श्रद्धेचा आधार हरपला आहे.
त्यांचा साधा, प्रेमळ आणि धार्मिक स्वभाव सदैव स्मरणात राहील. त्यांनी दिलेले संस्कार आणि आशीर्वाद अनेकांच्या आयुष्याला दिशा देणारे ठरले.
दैनिक साई दर्शन परिवार या दुःखद प्रसंगी नागरे कुटुंबाच्या दुःखात सहभागी असून, ईश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो.
ॐ शांती… 🙏🌹

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button