Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
अ.नगरराजकीय

शिर्डी विधानसभा मतदारसंघात १९२ मतदारांनी केले गृह मतदान

शिर्डी, दि.१६ – शिर्डी विधानसभा मतदारसंघात १९२ मतदारांनी गृह मतदानाचा (होम वोटिंग) हक्क बजावला‌ आहे. यामध्ये ८५ वर्षांवरील १७५ ज्येष्ठ नागरिक, १७ दिव्यांग मतदारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ८५ वर्षांवरील आणि मतदान केंद्रापर्यत पोहोचू न शकणाऱ्या दिव्यांग मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती.

यासाठी नमूना १२ डी भरून घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी गृह मतदानासाठी १९८ मतदारांनी नोंदणी केली होती. १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत गृह मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. १४ नोव्हेंबर रोजी ९८ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ८५ ज्येष्ठ नागरिक व १३ दिव्यांग मतदारांचा समावेश होता. १५ नोव्हेंबर रोजी ९४ मतदारांनी मतदान केले.

यामध्ये ९० ज्येष्ठ नागरिक व ४ दिव्यांग मतदारांचा समावेश होता. दोन दिवसात १९८ पैकी १९२ जणांनी मतदान केले आहे. ४ जण मयत आहेत. २ जण रूग्णालयात दाखल आहेत. केंद्राध्यक्ष, मतदान‌ अधिकारी व‌ सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश असलेल्या ८ पथकांच्या माध्यमातून गृह मतदान मोहीम राबविण्यात आली. गृह‌ मतदानांसाठी टपाली मतपत्रिकेचा वापर करण्यात आला.

निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी तथा समन्वयक अधिकारी जालिंदर पठारे,‌नायब तहसीलदार हेमंत पाटील, बाळासाहेब मुळे, मनोज भोसेकर यांच्या देखरेखीखाली मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button