Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
राजकीयशिर्डी

शिर्डीत प्रसाद वितरणात बदल-प्रत्येक भाविकाला एकच लाडू पाकीट

शिर्डी | प्रतिनिधी
देशात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर त्याचा परिणाम आता शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी यांच्यावरही दिसू लागला आहे. इंधनाची बचत आणि गॅसचा वापर नियंत्रित करण्याच्या उद्देशाने संस्थानाने महत्त्वाचा निर्णय घेत आजपासून साईभक्तांना प्रसाद म्हणून प्रत्येक भाविकाला केवळ एकच लाडू प्रसाद पाकीट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या निर्णयाबाबत संस्थानाच्या लाडू काउंटरवर स्पष्ट सूचना लावण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रसाद म्हणून एकच लाडू पाकीट दिले जाणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डीत दररोज देश-विदेशातून हजारो साईभक्त दर्शनासाठी येत असतात. साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसाद म्हणून लाडू घेण्याची परंपरा असल्यामुळे संस्थानाच्या प्रसादालयात दररोज मोठ्या प्रमाणावर लाडू तयार केले जातात. सध्या दररोज सुमारे ४० ते ४५ हजार लाडू पाकिटांची विक्री होत असते. त्याचबरोबर सुमारे ५० हजार बुंदी प्रसाद पाकिटांचे मोफत वितरण देखील संस्थानाकडून करण्यात येते.


या सर्व प्रसाद निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर गॅसचा वापर करावा लागतो. सध्या देशभरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या परिस्थितीचा विचार करून संस्थानाने गॅसचा वापर काटकसरीने करण्याचा निर्णय घेतला आहे. साई संस्थानाकडे सध्या सुमारे २० दिवस पुरेल एवढा गॅस साठा उपलब्ध असला तरी भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन इंधन बचतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


पूर्वी अनेक भाविक स्वतःसाठी तसेच आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि ओळखीच्या लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर लाडू प्रसाद घेऊन जात असत. त्यामुळे लाडू पाकिटांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत होती. परिणामी प्रसाद निर्मितीचा खर्च तसेच गॅसचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढत होता.


दरम्यान सध्याच्या परिस्थितीत गॅसचा वापर नियंत्रित ठेवणे आवश्यक असल्याने संस्थानाने ही मर्यादा लागू केली आहे. त्यामुळे आता प्रत्येक भाविकाला केवळ एकच लाडू प्रसाद पाकीट देण्यात येणार असून भाविकांनी या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.
गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानाने घेतलेला हा निर्णय सध्या शिर्डीत चर्चेचा विषय ठरत असून भाविकांकडूनही या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button