Letest News
शिर्डीत दिवसाढवळ्या धर्मशाळेची भिंत जमीनदोस्त शिवसेना पदाधिकाऱ्यासह ५ जणांवर गुन्हा संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई AI चा गैरवापर की राजकीय कट? पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नावाने मॉर्फ ऑडिओ-व्हिडिओ प्रकरण-संगम... शरीरात घुसला चक्क बॉलपेन- श्री साईनाथ रुग्णालयात दुर्मिळ व जीवघेण्या शस्त्रक्रियेला यश शिर्डीतील महिला हत्येनंतर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची काव्यात्मक टीका-सोशल मीडियावर चर्चेला उध... शिर्डीच्या भूमिपुत्री डॉ. सिमरन साई कोतकर यांची वारकऱ्यांसाठी निस्वार्थ सेवा-सर्वत्र कौतुकाचा वर्षाव शिर्डी पोलिसांचा गुटखा माफियांवर धडक प्रहार! दोन ठिकाणी एकाच वेळी छापे दोघे ताब्यात हजारो रुपयांचा ग... साई समाधीवरील चित्रीकरण प्रकरण पेटले- सखोल चौकशीसह फोटो एडिट करून विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची ... महिलेचा खळबळजनक आरोप-बलात्कार-पिस्तुलाचा धाक जीवे मारण्याच्या धमक्या शिर्डी पोलिसांत मध्यरात्री FIR जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन
अ.नगरखेळ

इकबाल काकर,शैक्षणिक सामाजिककार्य गौरव पुरस्काराने सन्मानित !

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील शिक्षण क्षेत्रात नावाजलेली अलमीजान उर्दू प्राथमिक शाळेचे शिक्षक इकबाल इस्माईल काकर यांना नुकताच शिक्षक दिनानिमित्त ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभान तालुका श्रीरामपूर यांच्यावतीने शैक्षणिक व सामाजिक कार्य गौरव या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ लखनऊ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव प्राचार्य डॉ.के.एच. शिंदे होते. याप्रसंगी ज्ञानज्योती संस्थेच्या वतीने १०१ अनाथ निराधार मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले,

तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा दिमागदार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यास राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला भगिनी, शिक्षक, शिक्षिका व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तबगार महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.तसेच निराधार बालके, पालक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी शासकीय सेवा, आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक , शैक्षणिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक, धार्मिक, महिला सक्षमीकरण, कृषी, आदर्श सरपंच, उपसरपंच, स्वच्छ व सुंदर शाळा अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


यावेळी जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र (तात्या) फडके कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. के.एस. शिंदे, माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे,पत्रकार करण नवले, ज्ञान ज्योति बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत,ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये,निसर्ग व पर्यावरण मंडळाचे राज्य संघटक डॉ. प्राध्यापक आणि लोखंडे सेवा संस्थेचे चेअरमन मंजाबापू थोरात, ह.भ.प.

दत्तात्रय बहिरट महाराज, श्रीरामपूर नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजीवन दिवे, ज्येष्ठ ग्रामीण कवी पोपटराव पठारे, आरोग्य मित्र सुभाषराव गायकवाड, वात्सल्य मिशन समितीचे बाळासाहेब श्री.जपे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे , प्राचार्य जयकर मगर

,श्रीधर गाडे, विद्रोही सामाजिक चळवळीचे अध्यक्ष तथा बैतुश्शिफा हॉस्पिटलचे डॉ. सलीम शेख, बसपा चे कांबळे सर, शिक्षक संघटनेचे नेते सतीश जाधव, शमशेर खान पठाण , केंद्रप्रमुख राजू इनामदार, केंद्रप्रमुख पिलगर सर, जुनेद जमील काकर , दानियल काकर ,राजूभाई शेख, शिक्षक नेते नाना, इंजि.श्री. बडाख, राऊत सर आदि मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button