Letest News
शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन
क्राईमशिर्डी

अपहरण-अमानुष हत्या अन् पोलिसी हलगर्जीपणा राहाता–शिर्डी परिसर हादरला-गुन्हेगारांची माजलेली दहशत

राहाता / शिर्डी | निर्भीड प्रतिनिधी – दैनिक साईदर्शन
गेल्या वीस दिवसांपूर्वी राहाता येथील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळीने शिर्डी येथून सचिन गिधे व राहाता येथील एका युवकाचे अपहरण केले होते.
या घटनेत एका युवकाला बेदम मारहाण करून जखमी अवस्थेत सोडून देण्यात आले, तर दुसरा युवक सचिन गिधे याला अज्ञात ठिकाणी नेऊन अत्यंत क्रूर पद्धतीने टायर मध्ये घालून डिझल टाकून ठार करण्यात आले.
ही घटना केवळ हत्या नसून, राहाता परिसरात माजलेल्या गुन्हेगारी मस्तवालपणाचा कळस आहे.

sai nirman
जाहिरात
☠️

मुख्य आरोपी फरार, मृतदेहाचा उलगडा रखडला
या अमानुष हत्याकांडातील मुख्य आरोपी दीपक पोकळे हा तब्बल अनेक दिवस फरार असल्याने
सचिन गिधे याचा मृतदेह कुठे आहे, याचा उलगडा होत नव्हता.
पोलीसांनी यापूर्वी मुख्य आरोपीच्या कुटुंबीयांना व काही साथीदारांना ताब्यात घेतले,
मात्र ही कारवाई फक्त दिखावा ठरली — निष्पन्न काहीच झाले नाही.

🗞️

सर्वप्रथम दैनिक साईदर्शनचा आवाज, तेव्हाच यंत्रणा जागी!
या संपूर्ण प्रकरणात सर्वप्रथम निर्भीडपणे आवाज उठविला तो दैनिक साईदर्शनने!
राहात्याचे पोलीसांच्या हलगर्जीपणावर बोट ठेवत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
त्यानंतरच पोलीस यंत्रणेला खऱ्या अर्थाने जाग आली.
नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने रात्रंदिवस मेहनत घेत मुख्य आरोपी दीपक पोकळे यास ताब्यात घेतले.

DN SPORTS
🚨

खाक्या दाखवताच कबुली – “सचिन गिधेचा खात्मा केला”
पोलीस कोठडीत खाक्या दाखवताच मुख्य आरोपीने सचिन गिधे याचा खून केल्याची कबुली दिली.
यामुळे ही हत्या पूर्वनियोजित व अमानुष असल्याचे स्पष्ट झाले आहे.

❓

राहाता पोलीस स्टेशनची भूमिका संशयास्पद
ही घटना राहाता पोलीस स्टेशन हद्दीत घडलेली असताना
मुख्य आरोपीस अटक करण्यात राहाता पोलीस अपयशी का ठरले?
हा प्रश्न आज संपूर्ण तालुक्यात विचारला जात आहे.
जर स्थानिक पोलीस वेळेत कठोर कारवाई केली असती,
तर सचिन गिधेचा जीव वाचला असता ?
हा सवाल आता नागरिक विचारत आहेत.

💰

गुन्हेगारांची आर्थिक ताकद कुठून?
या गुन्हेगारांना एवढी हिंमत येते तरी कुठून?

🔴

राहाता शहरात राजरोसपणे बिंगो मटका, जुगार, काळा-पिवळा व्यवसाय सुरू आहे

🔴

अवैध धंद्यांतून मिळणाऱ्या हरामाच्या पैशावर हे गुन्हेगार फोफावले

kamlakar
🔴

याच पैशातून अपहरण, मारहाण व हत्या केली जात आहे

⚠️

 राहात्याचे पोलीस आर्थिक मोहजाळ्यात अडकलेत का?
इतके सगळे उघड असताना सुद्धा
आजही राहाता शहरातील मोक्याच्या ठिकाणी हे अवैध धंदे सुरूच आहेत.
मग प्रश्न उभा राहतो –

👉

आणखी किती मर्डर झाल्यावर राहाता पोलीस जागे होणार?

👉

पोलीस आर्थिक मोहजाळ्यात अडकले आहेत का?

👮

वरिष्ठ अधिकारी सक्षम, पण खालची यंत्रणा ना-लायक?
जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे , अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व उपविभागीय अधिकारी अमोल भारती सक्षम असतानाही
खालच्या स्तरावरील निष्क्रिय व संशयास्पद कारभारामुळे
पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होत चालली आहे.

🔥

मोक्का लावा, अवैध धंदे बंद करा – जनतेची ठाम मागणी
आता नागरिकांची ठाम मागणी आहे की –

✔️

राहाता शहरातील सर्व अवैध व्यवसाय तत्काळ बंद करावेत

✔️

बिंगो मटका, जुगार, काळा-पिवळा व गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी

✔️

गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी

✔️

पोलिसी संगनमताची सखोल चौकशी करावी

🗞️

पुढील ८ दिवस दैनिक साईदर्शनचा निर्णायक लढा!
निर्भीड दैनिक साईदर्शन स्पष्ट शब्दांत जाहीर करतो –

👉

पुढील ८ दिवस आम्ही हे प्रकरण सोडणार नाही.

👉

जोपर्यंत राहाता येथील सर्व अवैध व्यवसाय बंद होत नाहीत, तोपर्यंत आवाज उठत राहील.

🔍

पुढील भागात वाचा…

👉

अवैध व्यवसायांना पाठबळ देणारे नेमके कोण?

👉

त्यावर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख काय कारवाई करतात?
सत्य, निर्भीड आणि निर्भय पत्रकारितेसाठी वाचा –
दैनिक साईदर्शन

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button