Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

शिर्डी ते मुंबई अजून एक नवीन ‘वंदे भारत ट्रेन’

शिर्डी : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी (4 ऑक्टोबर) शिर्डीत येऊन साई मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वैष्णव यांनी सांगितलं की, “शिर्डी-मुंबई फास्ट कनेक्टिव्हिटीसाठी

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिर्डी ते नाशिक असा दुहेरी रेल्वे मार्ग टाकण्याच्या आराखड्यावर काम सुरू असून लवकरच या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात होणार. यासोबतच प्रस्तावित पुणे-नाशिक रेल्वे मार्गही पूर्ण केला जाईल.” तसंच शिर्डी ते मुंबईसाठी दुसऱया ‘वंदे भारत ट्रेन’ची माहिती वैष्णव यांनी दिली.

दरम्यान, शिर्डीहून मुंबईकडं धावणाऱ्या’ ‘वंदे भारत ट्रेन’च्या वेळेत बदल करण्याची मागणी शिर्डी ग्रामस्थ शिवाजी गोंदकर, सचिन शिंदे, चैतन कोते, सुजित गोंदकर यांनी केली. भाविकांना शिर्डीला ये-जा करताना अनेक अडचणी येत आहेत.

तसंच शिर्डी ते मुंबई अजून एक नवीन ‘वंदे भारत ट्रेन’ सुरू करण्याची विनंती ग्रामस्थांनी अश्विनी वैष्णव यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी अश्विनी वैष्णव यांनी ग्रामस्थांच्या निवेदनाला उत्तर देत सर्व मागण्या लवकरच मान्य केल्या जातील,

असं आश्वासन दिलं.साई समाधीच्या दर्शनानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साईबाबांची मूर्ती व शाल देवून मंत्री अश्विनी वैष्णव यांचा सत्कार केला. दरम्यान, अश्विनी वैष्णव यांनी साईबाबांच्या द्वारकामाई व गुरुस्थानचेही दर्शन यावेळी घेतलं. यावेळी साई संस्थानच्या अधिकाऱ्यांसह शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button