Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
क्राईमशिर्डी

सुसाईड नोटमध्ये नाव- FIR मध्येही उल्लेख-तरी चार्जशीटमधून ‘अशोक खरात’ गायब — नेमकं चाललंय काय?

शिर्डी | प्रतिनिधी (दैनिक साई दर्शन विशेष मालिका)
साई संस्थान कर्मचारी विकास रामदास दिवटे आत्महत्या प्रकरणात आता सर्वात धक्कादायक वळण समोर आले आहे. मयताने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये भोंदू बाबा अशोक खरात याचे नाव स्पष्टपणे नमूद असल्याची माहिती समोर आली असतानाच, याच नावाचा उल्लेख एफआयआरमध्येही करण्यात आला होता. मात्र, पुढे दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमधून अशोक खरातचे नावच वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत आणि प्राथमिक तपासात ‘अशोक खरात’ याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मयत व्यक्तीवर मानसिक दबाव, धमक्या आणि त्रास दिल्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय स्पष्टपणे व्यक्त करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्येही त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले होते.
मात्र, तपासाची पुढील प्रक्रिया पूर्ण होत असताना सादर करण्यात आलेल्या चार्जशीटमधून अशोक खरातचे नाव अचानक गायब झाल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. इतक्या गंभीर प्रकरणात, सुसाईड नोट आणि एफआयआरमध्ये नाव असलेली व्यक्ती चार्जशीटमधून कशी व का वगळली गेली? यामागे कोणाचा दबाव किंवा प्रभाव होता का? असे थेट प्रश्न उपस्थित होत आहेत.


⚠️ तपासावरच प्रश्नचिन्ह
सुसाईड नोटसारखा महत्त्वाचा पुरावा आणि एफआयआरमधील स्पष्ट उल्लेख असूनही संबंधित व्यक्तीचे नाव चार्जशीटमधून वगळले जाणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. यामुळे संपूर्ण तपास प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
🔥 ‘कॅप्टन खरात’ला कोणाचे संरक्षण?
शिर्डीत वादग्रस्त ठरलेले ‘कॅप्टन खरात’ हे नाव पुन्हा चर्चेत आले असून, त्याला कोणत्या प्रभावशाली व्यक्तींचे संरक्षण मिळत आहे का? अशी चर्चा रंगली आहे. विशेषतः आधीच संगनमत आणि आर्थिक तडजोडीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही बाब अधिकच गंभीर ठरत आहे.


🛑 चौकशीची मागणी तीव्र
चार्जशीटमधून नाव वगळण्याचा निर्णय कोणी घेतला? कोणत्या कारणावरून घेतला? याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून सत्य बाहेर आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
👉 पुढील भागात:
✔️ सुसाईड नोटमधील नेमके उल्लेख
✔️ एफआयआर ते चार्जशीट — नेमका बदल कुठे झाला?
✔️ ‘कॅप्टन खरात’ला मिळालेले कथित संरक्षण उघड
फक्त दैनिक साई दर्शनवर…

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button