Letest News
भोंदू अशोक खरातवर शिर्डी पोलिसांचा फास आवळला! कोट्यवधींच्या बनावट खात्यांसह सावकारी-जमीन घोटाळ्याचा ... दोन आरोपी गजाआड- कल्पना खरात अजूनही फरार⚖️ अटकपूर्व जामिनावर सुनावणी- पुढील तारीख 16 एप्रिल मिलिट्री सामानाच्या ट्रकला भीषण आग- पोलिसांवर गंभीर आरोप- परिसरात खळबळ दानशूर उद्योगपती अनंत अंबानी यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा “छेडछाड केल्यास थेट कारवाई!” – ‘शी-बॉक्स’ पोर्टल अधिक कडक मयत दिवटे प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक वाकचौरे यांचा संकेत – फेरतपासाची शक्यता “राहता मटन मार्केटमध्ये संतापजनक प्रकार-मेलेल्या बोकडाचे मटन विक्री- दुकानदारावर कारवाईचा बडगा!” दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्याशी भेट-बजरंगबलीची मूर्ती देऊन सत्कार शिर्डी ते पनवेल … फसवणुकीचा खेळ उघड! 50 हजारांच्या झोपडपट्टीत घुसून शिर्डी पोलिसाने केला आरोपीचा ‘गे... “भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा मोठा स्फोट; SIT च्या पहिल्याच पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे!”
राजकीयशिर्डी

खाकी वर्दीतली माणुसकी उजळली! राहाता पोलिसांनी फिट आलेल्या ट्रकचालकाचा वाचवला जीव

राहाता | प्रतिनिधी
खाकी वर्दी म्हणजे केवळ कायदा नव्हे, तर त्यामागे संवेदनशील माणूसही असतो, याचा प्रत्यय राहाता पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून दिला आहे. रस्ता चुकल्याने तणावात आलेल्या व अचानक फिट आलेल्या ट्रकचालकावर तत्परतेने उपचार करत पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दोन दिवसांपूर्वी सोलापूरहून एक ट्रक व त्यातील दोन चालक राहाता बाजार समितीमध्ये कांदा भरण्यासाठी निघाले होते. मात्र, गुगल मॅपच्या आधारे मार्ग शोधताना ट्रक चुकून पंचायत समिती व पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळला. पंचायत समितीची कमान आणि समोरच पोलीस ठाणे दिसताच चालक तणावात गेला आणि त्याला अचानक फिट आली.
ही परिस्थिती पाहून ट्रकच्या क्लीनरने घाबरून मदतीसाठी आरडाओरडा केला. आवाज ऐकताच राहाता पोलीस ठाण्यातील कर्मचारी शिरसाट व त्यांच्या सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता ट्रकजवळ धाव घेतली. चालकाची गंभीर अवस्था पाहून तेथील महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ शेजाऱ्यांकडून कांदा आणून प्राथमिक उपचार केले.

दरम्यान, पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिकेला संपर्क केला. मात्र, रुग्णवाहिका येण्यासाठी किमान एक तास लागेल असे सांगण्यात आले. या वेळेत चालकाला नगर–मनमाड महामार्गावर नेण्यासाठी खाजगी वाहन मिळते का, यासाठीही प्रयत्न सुरू होते. तोपर्यंत कांद्याच्या उपचाराचा सकारात्मक परिणाम झाला आणि चालकाची फिट उतरून तो शुद्धीवर आला.
यानंतर पोलिसांनी चालकाला ट्रकच्या केबिनमधून खाली उतरवून सुरक्षित ठिकाणी बसवले. त्याला चहा-बिस्किटे देत सुमारे अर्धा तास विश्रांती घेऊ दिली. प्रकृती पूर्णपणे स्थिर झाल्यानंतर पोलिसांनी त्याला सावकाश व काळजीपूर्वक प्रवास करण्याचा सल्ला दिला.

या मानवतावादी मदतकार्यात पत्रकार राजूभाई पठाण, मनसेचे जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गांधी यांनीही मोलाचा सहभाग नोंदवला.
कायद्याची अंमलबजावणी करतानाच जीव वाचवण्याची जबाबदारीही आम्ही विसरत नाही, असा मूक संदेश देत राहाता पोलिसांनी खाकी वर्दीतील माणुसकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button