Letest News
सुरांची सम्राज्ञी काळाच्या पडद्याआड… — कमलाकर कोते पाटील भावपूर्ण श्रद्धांजली सुरांची सम्राज्ञी हरपली आशा भोसले यांच्या निधनाने संगीतविश्व शोकमग्न शिर्डीत आमिर खान भावुक “ही माझ्... भोंदू अशोक खरातचा धक्कादायक खेळ उघड ‘श्रद्धेच्या नावाखाली दहशत!’ विशेष संपादकीय………………………..शिर्डी–शेगाव तुलना की दिशाभूल? अर्धसत्यांचा भंडाफोड . श्रद्धा- सेवा आणि वास... साई सेवेत प्रामाणिकतेचा सुवास- रवींद्र सर्जेराव लोखंडे कर्मचाऱ्याने दाखवला आदर्श 🌸 “सुरांच्या दुनियेतील तेजस्वी तारा निघून गेला”💔 “अखेर सूर थांबले… आशा भोसले युगाचा अंत”💫 “आवाज गेला... कोट्यवधींचं दान… पण भाविकांच्या गाड्यांना ‘धूळ दान’च!”⚠️ “जेष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांचा सवाल—भा... भोंदू अशोक खरातवर शिर्डी पोलिसांचा फास आवळला! कोट्यवधींच्या बनावट खात्यांसह सावकारी-जमीन घोटाळ्याचा ... दोन आरोपी गजाआड- कल्पना खरात अजूनही फरार⚖️ अटकपूर्व जामिनावर सुनावणी- पुढील तारीख 16 एप्रिल मिलिट्री सामानाच्या ट्रकला भीषण आग- पोलिसांवर गंभीर आरोप- परिसरात खळबळ
Blog

गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ४०० कोटींची मान्यता घेणार : खा लोखंडे

शिर्डी :-
१०० वर्षांपूर्वी तयार झालेल्या गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यातून ७५० क्यूसेकने पाणी यायला पाहिजे परंतु आज ते टेलला फक्त ५० क्यूसेकने पोहचत आहे, त्यामुळे कोपरगाव, राहाता व श्रीरामपूर भागातील शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे . त्यामुळे प्रथम नाशिक सिंचन भवन येथे अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर कालवा रुंदीकरण व खोलीकरनासाठी तयार केलेल्या ४०० कोटींच्या प्रस्तावाला मान्यता घेण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी गोदावरी उजवा व डावा कालवा कृती समिती व अधिकारी यांच्या समवेत बैठक होणार असल्याचे प्रतिपादन खा सदाशिव लोखंडे यांनी केले .

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


नुकताच लोकसभेत घाटमाथा प्रश्न पोटतिडकीने व साई बाबांच्या आशीर्वादाने मांडल्यामुळे गोदावरी समिती व शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी सन्मान आयोजित केला होता, यावेळी ते बोलत होते . सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पडणारे पाणी पश्चिमेच्या समुद्राला वाहून जाते तेच ११५ टीएमसी पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी खा लोखंडे यांची धडपड सुरू आहे, याविषयी खा लोखंडे यांच्या पुढाकाराने घाटमाथा प्रकल्पाचे सर्वेक्षण देखील झाले असून मोठा निधी लागणार आहे . केंद्र व राज्याच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याने गोदावरी समितीकडून खा लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला व निळवंडे लाभधारकांनी देखील त्यांचा सन्मान केला आहे .

kamlakar

गोदावरीचा उजवा कालवा हा ११० किमीचा व दावा कालवा ८० किमीचा असून सध्या फक्त यातून १५० क्यूसेकने पाणी येत आहे व ते टेलला फक्त ५० क्यूसेकने पोहचत आहे . आता या कालव्यांची दुरुस्ती होणार असून घाटमाथा पाणी आल्यानंतर गोदावरी , मुळा व प्रवरेला तसेच महत्वाचे म्हणजे निळवंडेची आवर्तन संख्या वाढणार आहे . त्यामुळे खा सदाशिव लोखंडे यांचा मोठा सन्मान शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत .
यावेळी शिर्डी विश्रामगृहात सत्कारासाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, कॉ राजेंद्र बावके, रावसाहेब गाढवे, संजय सदाफळ, राजेंद्र दंडवते, राजेंद्र कार्ले, रावसाहेब थोरात, राजेंद्र चौधरी, माधवराव चौधरी, मनील नरोडे, नगरसेवक भागवत आरोटे तसेच राज लोखंडे आधी मान्यवर उपस्थित होते .

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button