Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरक्राईम

अ‍ॅक्शन मोडमध्ये पोलीस अधीक्षक! गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी 220 सराईत आरोपींचे विशेष समुपदेशन

अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांनी अ‍ॅक्शन मोडमध्ये येत मोठी प्रतिबंधात्मक मोहीम राबविली आहे. दक्षिण विभागातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गंभीर गुन्ह्यांमध्ये नोंद असलेल्या तब्बल 220 रेकॉर्डवरील आरोपींना पोलीस मुख्यालयात बोलावून त्यांचे विशेष समुपदेशन करण्यात आले. यावेळी आरोपींकडून इंट्रॉगेशन फॉर्म भरून घेण्यात आले तसेच प्रतिबंधात्मक कारवाईसंदर्भातील बंधपत्रांची माहितीही घेण्यात आली.
समुपदेशनादरम्यान पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आरोपींना कायद्याच्या चौकटीत राहून वागण्याचा स्पष्ट सल्ला देत, गुन्हेगारीचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले. भाईगिरी, गँगवार, खंडणी, मारामारी, दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर शस्त्रांचा वापर अथवा कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


अशा प्रकारच्या घटना घडल्यास संबंधितांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपारची प्रक्रिया आणि इतर कठोर कायदेशीर उपाय तत्काळ राबविण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना कायम राहावी आणि जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्हा पोलीसांनी अवैध धंदे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे, फरार आरोपी आणि सराईत गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम सुरू केली असून सातत्याने धडक कारवाया केल्या जात आहेत. त्याच मोहिमेचा भाग म्हणून हे विशेष समुपदेशन आयोजित करण्यात आले.


या उपक्रमामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला असून, भविष्यातही गुन्हेगारीविरोधातील अशाच कठोर आणि प्रतिबंधात्मक कारवाया सुरू राहतील, असा ठोस संदेश अहिल्यानगर पोलीस दलाने दिला आहे.
या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, दक्षिण विभागातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच संबंधित पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button