Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरक्राईम

श्रीरामपुरच्या आरोपीनी कोपरगावांत एकास दाखवला गावठी कट्टा

कोपरगाव शहरात धारणगाव रोडवर मागील भांडणाचे कारणावरून काल सायंकाळी पाच वाजता गाडीतून येऊन श्रीरामपूर येथील आरोपी शाहरुख रज्जाक शेख,तौफिक सत्तार,जान महंमद मेमन,तन्वीर रंगरेज रा.संजयनगर,कोपरगाव आदींनी गांधीनगर कोपरगाव

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

येथील फिर्यादी नाजिम इस्लौद्दिन शेख (वय -26)यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असून शाहरुख शेख याने त्यास गावठी कट्टा दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.त्यामुळे या आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरगाव शहरात अलीकडील काळात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे सामान्य माणसाला जीव मुठीत धरून जगण्याची नामुष्की ओढवली असल्याचे दिसून येत आहे.अशीच घटना नुकतीच उघड झाली असून यात सोमवार दिनांक 09 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास धारणगाव रोडवर वरील आरोपी शाहरुख रज्जाक शेख,

तौफिक सत्तार,जान महंमद मेमन,तन्वीर रंगरेज रा.संजयनगर,कोपरगाव आदी आपल्या चार चाकी गाडीतून आले व त्यांनी फिर्यादी नाजीम शेख यास मागील भांडणाच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असून शाहरुख शेख याने त्यास गावठी कट्टा दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.व फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची साखळी बळजबरीने काढून नेली आहे.त्यामुळे या आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.392/2024 भारतीय दंड संहिता सन- 2023 चे कलम 119(1),115,(2),352,351(2),3(5),अवैध शस्त्र अधिनियम कलम 3(25) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे,पोलिस उपनिरीक्षक एस.सी.पवार यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button