मॉर्निंग क्रिकेट क्लबसावळीविहीरच्या वतीने सरपंच व उपसरपंच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बुधवार पासून आयोजन!

शिर्डी (प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील
सावळीविहीर येथील मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने दिनांक 15 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2023 या कालावधीत सरपंच व उपसरपंच चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सावळीविहीर फाटा येथील गारगोटी मैदान येथे या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होणार असून प्रत्येक संघासाठी प्रवेश फी पंधराशे रुपये राहणार आहे.
या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषक रुपये 15000 हे सावळी विहीर बुद्रुकचे सरपंच ओमेश साहेबराव जपे पा.यांच्याकडून देण्यात येणार आहे. तर द्वितीय पारितोषिक रुपये 11000 हे सावळीविहीर खुर्द चे मा. सरपंच महेश जमधडे पा. यांच्याकडून तर तृतीय पारितोषक रुपये पाच हजार हे सावळीविहीर बुद्रुकचे उपसरपंच विकास नानासाहेब जपे पा. यांच्याकडून देण्यात येणार आहे.
या सरपंच व उपसरपंच चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत विजेत्यांना देण्यात येणाऱ्या ट्रॉफी सावळीविहीर बुद्रुकचे ग्रामपंचायत सदस्य श्री गणेश आगलावे पा. यांच्याकडून दिल्या जाणार आहेत. मंडप व साऊंड सौजन्य बाळकृष्ण मेडिकल चे युवा कार्यकर्ते किरण आगलावे पा. यांच्याकडून राहणार आहे. स्पर्धेसाठी लागणारे बॉल सौजन्य संदीप (आप्पा )चव्हाण (विशेष कार्यकारी अधिकारी)निघोज, यांचे राहणार असून
सावळीविहीर येथील जय शंकर मेन्स वेअर व साई संस्कार दूध संकलनचे सौरभ कैलास पळसे यांच्याकडून ग्राउंड सौजन्य राहणार आहे. पिण्याचे पाण्याचे जार चे सौजन्य ग्रामपंचायत सदस्य सागर आरणे यांच्याकडून होणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक संघामध्ये 11 खेळाडू असतील व एका खेळाडूला एका संघाकडून खेळता येईल.
सामन्यात फेरबदल करण्याचा अधिकार आयोजकांकडे राहील. स्पर्धेत पंचांचा निर्णय अंतिम राहील. सर्व सामने पोस्ट वाईज होतील. फेकी गोलंदाजी चालणार नाही. अशा नियम व अटी या स्पर्धेत राहणार आहेत. या सरपंच व उपसरपंच चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत नाव नोंदणीसाठी संपर्क चंद्रकांत जपे,मो.न. 96 04 92 36 21,
संतोष फुलारे,मो.नं.-95 03 80 29 23,
संदीप मिसाळ-मो.नं.-90 21 66 71 91,
अमोल दहिवाळ,मो.नं.-70 21 94 68 18.
पंकज निकम-मो.नं.-92 84 37 54 28.
, विशाल अहिरे ,-मो.नं.-86 0539 97 31
अनिल जाधव,मो.नं.–90 22 44 96 92 यांच्याकडे करायचा असून या स्पर्धेचे आयोजन पुंजाराम जपे ,गणेश पाटील, देवा सोळंके, शंकर सोळंके, रवी माळी, अमोल पवार ,वैभव जमधडे, प्रदीप बिडवे, रवींद्र पळसे, मच्छिंद्र कासार, गणेश जपे, ऋतिक जपे, आकाश जपे, अजय घुले ,सार्थक पळसे, सुरेश आहेर ,अमोल चव्हाण, शुभम आगलावे, दादा जपे, जय राजदे, कृष्णा आगलावे, उमेश अंभोरे, अनुज संतोष पळसे, नंदू शिंदे, पुंजा जगताप, रोहन जगताप, सागर माळी, साईनाथ चिखले, विजय गांधी, संजय धुमाळ, विनोद घुले, अभिषेक सदाफळ, किशोर जाधव, गणेश पाचोरे, नितीन लाड आदींसह मॉर्निंग क्रिकेट क्लब व क्रिकेट प्रेमींनी केले आहे.