Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
अ.नगरक्राईम

पुजाऱ्यासह मंदिर विहिरीत कोसळलं एकाच मृत्यू  

एक दुर्घटना कोल्हापुरातल्या गडमुडशिंगी गावात घडली आहे. विहिरीच्या काठावर असणाऱ्या जुनं नरसिंह मंदिर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मंदिरात पूजा करण्यासाठी बसलेले कृष्णात उमराव दांगटही (वर्षे 65 दांगट मळा, गडमुडशिंगी) कोसळले. त्यामुळे पुजाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

कोल्हापुरातील गडमुडशिंगी येथे विहिरीच्या काठावर 20 वर्षापूर्वी एक छोटं नरसिंह मंदिर उभारण्यात आलं होतं. कृष्णात उमराव दांगट आणि त्यांचं कुटुंबीय हे रोज नित्यनियमाने पूजा करीत असत. रोजच्या प्रमाणे आज सकाळी कृष्णा दांगट हे पूजेसाठी मंदिरात दाखल झाले.

पूजा सुरू असतानाच अचानक हे मंदिर त्यांच्यासह विहिरीत कोसळल. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी विहीर परिसरात पोहोचून कृष्णा दांगट यांचा शोध सुरू केला, पण कृष्णा दांगट दिसून आले नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना घटनेची वर्दी दिली.

यानंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे पथक पथक दाखल झाले. या पथकाने विहिरीत कृष्णा दांगट याची शोध मोहीम घेतली. त्यावेळी या दुर्घटनेत कृष्णात उमराव दांगट यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सामोर आलं.

विहिरी भोवती असणारी माती ढिसूळ झाल्यामुळे मंदिर कोसळल्याचं सांगितलं जात आहे. नित्यनियमाने नरसिंह देवाची पूजा अर्चा करणाऱ्या कृष्णा दांगट याचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button