Letest News
गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच...
अ.नगरशिर्डी

पंढरपूर प्रमाणे शिर्डीतही गर्दी काळात वशिल्याचे झटपट दर्शन बंद करावे, साई भक्तांची मागणी!

शिर्डी (प्रतिनिधी)

sai nirman
जाहिरात

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर समितीने वशिल्याने झटपट दर्शन हा प्रकार बंद करण्याचा निर्णय घेतला असून सोमवारपासूनच याची अंमलबजावणी केली जात आहे. या निर्णयामुळे सामान्य भाविकांना सुलभपणे व लवकर दर्शन मिळण्याची सोय होणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

DN SPORTS

kamlakar

असाच निर्णय शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने घ्यावा व शिर्डीतही गर्दी काळात झटपट वशिल्याचे दर्शन बंद करावे अशी मागणी साई भक्तांमधून होत आहे.
पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त आत्तापासूनच गर्दी होत आहे.दर्शन रांगेतील भाविकांचे जलद गतीने व सुलभपणे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन व्हावे यासाठी वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाचे वारकरी संप्रदाय मधून स्वागत केले जात आहे. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दररोज जवळपास एक लाखाहून अधिक भाविक सध्या दर्शनासाठी पंढरपूर मध्ये येतात. अनेक भाविक दर्शन रांगेतून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. दरम्यान अनेक लोकांना वसलेल्याचे दर्शन घडविले जाते.

यामुळे दर्शन रांग रखडते. ही बाब मंदिर समितीच्या लक्षात आल्यानंतर मंदिर समितीने झटपट वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी परिपत्रक काढले आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने आत्तापासूनच पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर मंदिर समितीच्या या निर्णयाचे सर्वसामान्य भाविकांमधून स्वागत केले जात आहे. दरम्यान मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी वशिल्याचे दर्शन दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

असा इशाराही या परिपत्रकातून देण्यात आला आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष, सदस्य आणि कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीशिवाय यापुढे कोणालाही मंदिरात दर्शनासाठी सोडले जाणार नाही .असा लेखी आदेश कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला आहे.

असाच निर्णय शिर्डीतही गर्दी काळात साई संस्थानने घ्यावा. दर्शन रांगेतील साई भक्तांना त्रास होऊ नये म्हणून गर्दी काळात शिर्डीतही झटपट वशिल्याने साई दर्शन बंद करावे. अशी मागणी आता साईभक्तांकडून जोर धरू लागली आहे. गुरु पौर्णिमा उत्सव लवकरच येणार असून या काळात गर्दी होणार आहे. तेव्हापासून या काळात झटपट वशिल्याचे दर्शन बंद करावे .अशी मागणी साईभक्त करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button