Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
शिर्डी

गुरु पौर्णिमेच्या निमित्त शिर्डीत लाखो साईभक्तांची मंदियाळी साईभक्‍तांच्‍या साईनामाच्‍या गजराने शिर्डी दुमदुमून गेली.

शिर्डी :-
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर गोव्‍यासह राज्‍याच्‍या विविध भागातून आलेल्‍या पालखीतील साईभक्‍तांच्‍या साईनामाच्‍या गजराने शिर्डी दुमदुमून गेली.
आज उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाली.काकड आरतीनंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. अखंड पारायण समाप्ती मिरवणूकीत संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा तर संरक्षण अधिकारी रोहिदास माळी व इंग्लिश मिडीअम स्‍कुलचे प्रचार्य आसीफ तांबोळी यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात, प्र.जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान झाले. सकाळी ०७.०० वाजता श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या निमित्‍त अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्‍यांची सुविद्य पत्नी सौ.मालती यार्लगड्डा यांनी श्रींची पाद्यपूजा केली. सकाळी ८.०० वाजता लेंडीबागेतील शताब्‍दी ध्‍वजाचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व सौ. मालती यार्लगड्डा तसेच मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व सौ. वंदना गाडीलकर यांच्‍या हस्‍ते पुजन करण्‍यात आले. गोव्‍यासह राज्‍यातील विविध ठिकाणाहुन आलेल्‍या पालखीतील साईभक्‍तांच्‍या साईनामाच्‍या गजराने शिर्डी दुमदुमून गेली.
सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० या वेळेत श्री नाना वीर, शिर्डी यांचा साईभजन कार्यक्रम झाला. दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. दुपारी ०१.०० ते दुपारी ०३.०० या वेळेत संजीव कुमार, पुणे यांचा भजनसंध्‍या कार्यक्रम, सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत ह.भ.प.श्री संतोष पित्रे, डोंबिवली यांचा कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. ७.३० ते रात्रौ १०.०० यावेळेत श्री नीरज शर्मा, दिल्‍ली यांचा भजन संध्‍याचा कार्यक्रम, रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून या दिवशी श्रींची शेजारती व दिनांक २२ जुलै रोजीची पहाटेचे श्रींची काकड आरती होणार नाही. आज रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन (हजेरी) कार्यक्रम मंदिराशेजारील स्टेजवर होईल.
गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी श्री साई भक्‍तांना शुद्ध व स्‍वच्‍छ पाणी पिण्‍यासाठी मिळावे याकरीता श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने श्री साई आश्रम (१००० रुम) भक्‍तनिवास येथे १० लाख रुपये किमतीचे देणगी स्‍वरुपात आलेल्‍या नविन अत्‍याधुनिक वॉटर प्‍युरीफायर प्‍लांटचे संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व देणगीदार साईभक्‍त अरुण तिवारी यांच्‍या हस्‍ते उद्घाटन करण्‍यात आले. यावेळी उप कार्यकारी अभियंता दिनकर देसाई, मॅकेनिकल विभाग प्रमुख अतुल वाघ, साई आश्रम भक्‍तनिवास विभागाचे प्र. अधिक्षक विजय वाणी आदी उपस्थित होते.
देणगी स्‍वरुपात आलेल्‍या नविन अत्‍याधुनिक वॉटर प्‍युरीफायर प्‍लांटची क्षमता २००० लिटर प्रती तास आहे. वॉटर प्‍युरीफायर प्‍लांटच्‍या उद्घाटनानंतर देणगीदार साईभक्‍त यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्‍कार केला.
उत्सवाच्या सांगता दिनी सोमवार दिनांक २२ जुलै रोजी पहाटे ०५.०५ वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०६.५० वाजता श्रींची पाद्यपुजा, सकाळी ०७.०० वाजता गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून सकाळी १०.०० ते १२.०० वाजता या वेळेत ह.भ.प.श्री वैभव ओक, डोंबिवली यांचा गोपालकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० चे दरम्‍यान श्रींची माध्यान्ह आरती होणार असून दुपारी ०१.०० ते ०३.०० या वेळेत श्रीमती वनिता बजाज, दिल्‍ली यांचा साईभजन कार्यक्रम होणार आहे. दुपारी ०४.०० ते ०६.०० या वेळेत श्री विरेंद्रकुमार, साई ब्रदर्स, प्रयागराज यांचा मनोहारी भक्‍तीमय भजनांचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत श्री. ग्‍यानेश वर्मा, मुंबई यांचा साईराम गुणगान कार्यक्रम होईल. रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button