Letest News
शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई!
क्राईमशिर्डी

स्मशानभूमीच्या पाठीमागे रंगला ‘तिरट’चा डाव शिर्डी पोलिसांची धडक कारवाई ७ जुगारी ताब्यात

शिर्डी : सावळीविहीर खुर्द गावातील स्मशानभूमीच्या पाठीमागील काटवणात बसून पत्त्यांवर हारजीतीचा जुगार खेळणाऱ्या सात जुगाऱ्यांवर शिर्डी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत जुगाराच्या डावातील रोख रक्कम व जुगाराचे एकूण ५२ पत्ते जप्त करण्यात आले असून सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सोमेश कैलास गरदास यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. सावळीविहीर खुर्द गावातील स्मशानभूमीच्या पाठीमागील काटवणात काही व्यक्ती पत्त्यांवर हारजीतीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाईचे नियोजन केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


पोलिसांच्या पथकाने पंचांसह घटनास्थळी जाऊन दुपारी सुमारे ४.३० वाजता छापा टाकला. यावेळी काही इसम हातात पत्ते घेऊन समोर पैसे ठेवून ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी अचानक छापा टाकून सर्वांना जागीच ताब्यात घेतले.
या कारवाईत रामकृष्ण कारभारी माळी (४२), किसन दगडू दारवंटे (४८), गणेश तात्याबा लकडे (३३), राजेंद्र शिवनाथ जाधव (४८), निलेश किसन इंगळे (३२), राजेंद्र दगडू दारवंटे (४५) आणि संदिप परसराम माळी (३१) या सात जणांना ताब्यात घेण्यात आले. सर्व आरोपी सावळीविहीर खुर्द, ता. राहाता येथील रहिवासी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेतली असता जुगाराच्या डावात ठेवलेली ३ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम तसेच जुगारासाठी वापरण्यात आलेले ५२ पत्ते ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईमुळे परिसरात उघड्यावर सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यांवर शिर्डी पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई केल्याची चर्चा सुरू असून, पुढील कायदेशीर कारवाई शिर्डी पोलीस करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button