Letest News
शिर्डीत दिवसाढवळ्या धर्मशाळेची भिंत जमीनदोस्त शिवसेना पदाधिकाऱ्यासह ५ जणांवर गुन्हा संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई AI चा गैरवापर की राजकीय कट? पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नावाने मॉर्फ ऑडिओ-व्हिडिओ प्रकरण-संगम... शरीरात घुसला चक्क बॉलपेन- श्री साईनाथ रुग्णालयात दुर्मिळ व जीवघेण्या शस्त्रक्रियेला यश शिर्डीतील महिला हत्येनंतर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची काव्यात्मक टीका-सोशल मीडियावर चर्चेला उध... शिर्डीच्या भूमिपुत्री डॉ. सिमरन साई कोतकर यांची वारकऱ्यांसाठी निस्वार्थ सेवा-सर्वत्र कौतुकाचा वर्षाव शिर्डी पोलिसांचा गुटखा माफियांवर धडक प्रहार! दोन ठिकाणी एकाच वेळी छापे दोघे ताब्यात हजारो रुपयांचा ग... साई समाधीवरील चित्रीकरण प्रकरण पेटले- सखोल चौकशीसह फोटो एडिट करून विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची ... महिलेचा खळबळजनक आरोप-बलात्कार-पिस्तुलाचा धाक जीवे मारण्याच्या धमक्या शिर्डी पोलिसांत मध्यरात्री FIR जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन
राजकीयशिर्डी

शिर्डी परिक्रमा उत्सव २०२६ च्या कार्याध्यक्षपदी मनीलाल पटेल यांची निवड – सर्वत्र अभिनंदन

शिर्डी (प्रतिनिधी):
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, ग्रीन अँड क्लिन शिर्डी तसेच समस्त शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या शिर्डी परिक्रमा उत्सव २०२६ च्या कार्याध्यक्षपदी श्री मनीलाल पटेल यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल शिर्डी परिसरात सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत असून विविध स्तरांतून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे.
भक्ती, सेवा आणि शिस्तीचा संगम
परिक्रमा उत्सवाला लाभणार सक्षम नेतृत्व
सामाजिक, धार्मिक व सेवाभावी कार्यात नेहमी सक्रिय असलेले श्री मनीलाल पटेल हे साईभक्तांमध्ये परिचित नाव आहे. त्यांच्या अनुभव, नियोजन क्षमता आणि सेवाभावामुळे यंदाचा शिर्डी परिक्रमा उत्सव अधिक शिस्तबद्ध, स्वच्छ व भक्तिमय वातावरणात पार पडेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य परिक्रमा
खंडोबा मंदिरातून प्रस्थान
शिर्डी परिक्रमा उत्सव २०२६ शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी शिर्डी येथील खंडोबा मंदिरापासून सुरू होणार असून, यामध्ये देश-विदेशातील हजारो साईभक्त सहभागी होणार आहेत. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि भक्तीभाव या त्रिसूत्रीवर आधारित परिक्रमेचे यंदाचे आयोजन असणार आहे.
मित्रपरिवाराकडून विशेष शुभेच्छा
“साईसेवेला नवे बळ मिळेल” असा विश्वास
आमचे मित्र श्री मनीलाल पटेल यांची या मानाच्या पदावर निवड झाल्याबद्दल मित्रपरिवार, साईभक्त, सामाजिक संस्था व ग्रामस्थांकडून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी परिक्रमा उत्सव अधिक यशस्वी आणि प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button