Letest News
शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई!
अ.नगरक्राईम

पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ

पाथर्डी : शहरातील समता पतसंस्थेने अचानक बोरिया-बिस्तर आवरून कार्यालय बंद केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रोजच्या व्यवहारासाठी येणाऱ्या नागरिकांना कार्यालय बंद दिसताच संतप्त ठेवीदारांनी संस्थेबाहेर गर्दी केली. अनेकांच्या आयुष्यभराच्या बचती अडकण्याची भीती निर्माण झाली असून शहरात चर्चांना उधाण आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपासून पतसंस्थेचे व्यवहार संशयास्पद पद्धतीने सुरू होते. ठेवीदारांना पैसे परत मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यानंतर अचानक कार्यालय बंद करण्यात आल्याने “संस्था फरार झाली का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
अनेक ठेवीदारांनी आपल्या कष्टाच्या कमाईची लाखो रुपयांची गुंतवणूक या पतसंस्थेत केली होती. आता मात्र कार्यालय बंद आणि जबाबदार अधिकारी संपर्काबाहेर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ठेवीदारांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. संबंधित संचालक, अधिकारी आणि व्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, प्रशासन आणि पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची प्रतीक्षा असून, या प्रकरणामुळे पाथर्डी शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button