Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
क्राईमशिर्डी

शिर्डीत १५ लाखांचे सोने गायब- वॉटर पार्कमधील घटनेने खळबळ-पोलिसांत अद्याप तक्रार नाही

शिर्डी (प्रतिनिधी) : शिर्डी परिसरातील एका वॉटर पार्कमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील महिलेचे सुमारे १५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गायब झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल सायंकाळी घडल्याची माहिती मिळत असून, यामुळे वॉटर पार्क परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या कुटुंबासह वॉटर पार्कमध्ये फिरण्यासाठी आली होती. यावेळी तिच्याकडे असलेले अंदाजे १५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हरवल्याचे तिच्या निदर्शनास आले. दागिने सापडावेत यासाठी महिलेने वॉटर पार्क प्रशासनाच्या मदतीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. मात्र, फुटेज तपासूनही दागिन्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


घटनेनंतर महिलेने स्वतःच्या स्तरावर शोधाशोध सुरू ठेवली असून, अद्याप या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे नेमके दागिने चोरीला गेले की कुठेतरी हरवले, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
दरम्यान, एवढ्या मोठ्या रकमेचे सोन्याचे दागिने गायब झाल्याची चर्चा परिसरात सुरू असून, संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यास पुढील तपासातून वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button