Letest News
पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद
राजकीयशिर्डी

भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि दीन-दलितांचे मुक्तिदाता-दीन-दलितांचे खरे उद्धारक : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

दीन – दलितांचे उद्धारक==
डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. गांधीजीनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेऊन एक महान कार्य केले म्हणून त्यांना महात्मा म्हणतात. टिळकांचा लोकमान्य म्हणून गौरव केला जातो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विविध जातीत . पंथात एवढेच काय पण विविध जातीत . प्रदेशात नांदणाऱ्या लोकांना समतेच्या . बंधुतेच्या . स्वातंत्र्याच्या आणि सामाजिक न्यायाच्या तत्वात एक गटीत करून सर्व माणसांची ओळख माणूस म्हणुच करून राष्ट्र ऐक्याच्या भावनेतून भारतीय प्रजासत्ताक राज्य बनऊन जातीत सलोखा निर्माण करण्याच्या अपेक्षेने सविधान केले
14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेश्यतील महू येथे रामजी व भीमाबाई या दाम्पत्याच्या पोटी डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म झाला. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन 18-18 तास अभ्यास. करून त्यांनी ज्ञान संपादन केले.. अस्पृश्याना मिळणाऱ्या हीन-, दीन वागणुकीची चिड येऊन समतेचा लढा पुकारला. हजारो वर्ष माणूसपनापासून हरवलेल्या माणसास माणसाची माणुसकी मान;सन्मान.; मिळउन दिला. आयुष्भर दिंन- दलितांसाठी संघर्ष केला.1927 साली चवदार तळ्यावर पाण्यासाठी सत्याग्रह केला. नंतर मंदिर प्रवेश मिळावा या करिता नाशिकच्या काळाराम मंदिरात सत्याग्रह केला. जीवनभर काळोख्या अंधारात गडप झालेल्या जनवरापेक्ष्या .हिन जीवन जगणाऱ्या माणसाला प्रकाश देउन माणुसकी मिळउन दिली.
बहुजनांच्या समतेच्या लढाईची गौतम बुद्धापासून चालत आलेली लढाई फुले-साहू ते आंबेडकरा पर्यंत पोहचली आणि आजही ती अपण लढत असल्याचे दिसून येते.
परंतू ब्राम्हण वाद्यानी अतिशय सावध राहून आपला ब्राम्हणवाद जपून ठेवला आहे. गौतम बुद्धांपासुन समतेची लढाई जरी लढली असली तरी सुद्धा आपल्या देशात समतावादी समाज व्येवस्था स्थापन झाली नाही. इंग्रजांच्या राजवटी मुळे भारतात सर्वांना शिक्षण मिळू लागले. तत्कालीन धर्म वेवस्था व कनिष्ठ श्रेष्ठ त्वाचा विचार केला तर आपल्या लक्षात येते की; ती वेवस्था ही फक्त उच्चवर्णीयांच्या आणि त्यांच्या हितसंबंधी यांच्या पुरतीच मर्यादित होती.1920पासुन भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला नव्या जोमाने सुरुवात होऊन महात्मा गांधीजी च्या प्रयत्नामुळे 15 ऑगस्ट 1947रोजी भारताची फाळणी भारत – पाकिस्तान या दोन स्वतंत्र देशात होऊन भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारताच्या घटना समितीवर जाणाऱ्या प्रतिनिधींची निवड विधी मंडळांनी केली.
बंगाल विधी मंडळांतील खुलांना या मतदार संघातून नमो सुद्राय या दलित वर्गातील प्रतिनिधी घटना समिती साठी डॉ. बाबसाहेब आंबेड कराना निवडून दिले. याला मुस्लिम लीगने पाठिंबा दिला होता. अश्या प्रकारे घटना समिती वर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली. त्यांच्या मार्गदर्शनखाली सर्वांना समानतेचा हक्क मिळाला.
या लेखा द्वारे मी माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना नम्र पणे सूचित करू इच्छितो की. आपण सर्वांनी काही अंशी तरी या महामान वाचे विचार आत्मसात करून आचरनात आणावेत.असे केले तर च खऱ्या अर्थाने डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवास खऱ्या अर्थाने श्रध्दांजली अर्पण केली जाईल.असे माझे प्रामाणिक मत आहे

sai nirman
जाहिरात

=सेवा निवृत्त शिक्षक=
श्री ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे सर.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button