Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
अ.नगरशिर्डी

श्री साईबाबा मंदिरातील श्री रामनवमी उत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने संपन्‍न

शिर्डी :-
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने सोमवार दिनांक ०५ एप्रिल पासून सुरु असलेल्‍या श्री रामनवमी उत्‍सवाची सांगता आज ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांच्‍या काल्याच्या किर्तनानंतर दहिहंडी फोडुन झाली.
आज उत्‍सवाच्‍या सांगता दिनी सकाळी ०६.५० वाजता संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व त्यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. वैशाली दराडे यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली. सकाळी ७.०० वा गुरुस्‍थान मंदिरात श्री साईबाबा संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांनी रुद्राभिषेक पूजा केली. श्री रामनवमी उत्सवाच्या सांगता दिनी श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मं‍डपाच्‍या स्‍टेजवर सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम महाराज नांदेडकर, गोरटे यांचा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्‍न झाला. कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्‍त तात्‍या पाटील कोते यांचे वंशज परीवारातील सदस्‍य श्री पारेश्‍वर बाबासाहेब कोते यांच्‍या हस्‍ते दहिहंडी फोडण्यात आली. यानंतर किर्तनकार महाराज यांचा श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्‍कार केला. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्‍यानंतर १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. हनुमान मंदिरा शेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्टेजवर दुपारी ०१.०० ते ०३.०० वा. यावेळेत द गोल्‍डन व्‍हॉईस स्‍टुडीओज, मुंबई यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. यावेळेत श्रीम. पुजा राठोर, जयपुर यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम, सायंकाळी ०६.३० वा. श्रींची धुपारती झाली. सायं. ०७.०० ते ०९.३० वा. यावेळेत मिराज इव्‍हेंटस्, मुंबई यांचा साई भजनसंध्‍या कार्यक्रम होईल. उत्‍सव कालावधीत पार पडलेल्‍या सर्व कार्यक्रमांना श्रोत्‍यांकडून उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद मिळाला. रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल.
हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश श्रीमती अंजु शेंडे (सोनटक्‍के), तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ पंकज आशिया व मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी संदिपकुमार भोसले, प्रज्ञा महांडुळे-सिनारे, विश्‍वनाथ बजाज, मुख्‍य लेखाधिकारी मंगला वराडे, वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button