Letest News
अपहरणं करून डोक्याला बंदूक लावत पन्नास लाखाच्या चेकवर सही करून घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिरे सुवर्णविजेते पदकचे माणकारी शनि शिंगणापूर देवस्थानचे तत्कालीन विश्वस्थ व उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी गळफास घेऊन केली आ... कोपरगावात जप्त वाहनांचा २९ जुलै रोजी लिलाव बँकेच्या सेटलमेंट नावाखाली एकाची फसवणूक चार लाखाला घातला गंडा  शिर्डी तेथील ठकसेन भूप्या सावळेच्या अडचणीत वाढ आजून ३२८ गुंतवणूक धारकांनी गुन्हे नोंदविले  गुन्हेगारांना खाकीचा धाकच राहिला  चक्क महिला पोलिसाचा भररस्त्यावर मंगळसूत्र चोरांनी लांबविला   शिर्डीतून चोरीला गेलेल्या तीन कोटी वीस लाखाचे सोने पैकी ७५ लाख रुपये एल सी बीने हडप केले? श्री साईबाबा संस्थान नाट्य रसिक मंच व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने 25 तारखे पासून पाराय... पुन्हा शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर उडविण्याची धमकी
Blog

आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डीत अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होण्याच्या ऐवजी चालली वाढतच!

शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी हे श्री साईबाबांमुळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झाले आहे. देश-विदेशात शिर्डी शहराचे नाव श्री साई मुळे पोहोचले आहे. शिर्डीला दररोज हजारो साई भक्त दर्शनासाठी येत असतात .त्यामध्ये व्हीआयपी,व्ही व्हीआयपी यांची संख्याही मोठी आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झाल्यामुळे येथे आपोआपच व्यवसाय, लोकसंख्या, इमारती, दळणवळण ,व शहर वाढतच आहे. मात्र येथे दररोज नवनवीन येणारे साई भक्त ,वाढणारी गर्दी व आर्थिक स्त्रोत लक्षात घेता येथे पाकीट मारी, चैन स्नेचिंग. धूम स्टाईल चोऱ्या, मोटरसायकल चोऱ्या, अवैध दारू धंदे, अवैध वेश्याव्यवसाय आदी, सरस मटका जुगार गांजा विक्री चरस विक्री असे अनेक अनधिकृत व्यवसाय येथे सर्रास सुरू आहेत. व दिवसेंदिवस वाढतच आहेत.पोलीस छापा टाकतात. मात्र काही दिवसातच परत जैसै थी परिस्थिती येथे होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाने राज्यात सर्वात मोठा जिल्हा असला तरी येथे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हे कर्तव्यदक्ष अधिकारी आले. आल्या आल्या त्यांनी गुन्हेगारीवर जिल्ह्यात मोठा वचक निर्माण केला . गुन्हेगारी अवैध धंदेही कमी झाले होते.मात्र हळूहळू नंतर परत हे अवैध धंदे ,गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावू लागली आहे. नगर जिल्ह्यात इतर शहरात किंवा इतर गावांमध्ये काही किरकोळ घटना किंवा गोष्टी वगळता शांतता आहे .पण शिर्डीत वरवर शांतता दिसते. मात्र शिर्डीत आर्थिक स्त्रोत, नवनवीन साई भक्तांच्या द्वारे येथे येणारे नवनवीन चेहरे ,अनेक हॉटेल लॉज येथे असल्याने बाहेरचे गुन्हेगार येथे येऊन लपतात. येथे आर्थिक स्त्रोत चांगले असल्यामुळे पाकीटमारी टोळ्या तयार झाल्या आहेत. स्थानिक व बाहेरचेही पाकीटमार येथे येऊन साई भक्तांची पाकिटे, महिलांचे पर्स, महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, एवढेच नव्हे तर धूम स्टाईल महिलांचे दागिने ओरबडणे , मोटरसायकल चोऱ्या करणे,

kamlakar

असे सर्व प्रकार येथे घडताना दिसतात. परंतु साईभक्त हे बाहेरगावचे असल्यामुळे विनाकारण झंझट नको म्हणून अनेकदा तक्रार पोलिसात करत नाहीत. अनेकदा साई भक्तांचे पाकीटे, पर्स गेल्यामुळे ,रोख रकमेबरोबरच रेल्वेची तिकिटे, एटीएम कार्ड ,आधार व इतर ओळखपत्र , मोबाईल हे सुद्धा पाकिटामध्ये चोरी जातात .त्यामुळे बाहेरील साई भक्तांना आपल्या गावी परतणेही मोठे मुश्किल होते. येथे तर मोबाईलवर बोलत असताना हातातून मोबाईल हीसकावून घेऊन जाण्याचे प्रकार वाढत आहेत. नुकतीच शिर्डीत अशी घटना घडली आहे. अशा चोऱ्या वेगवेगळ्या मार्गाने येथे सर्रास होत आहेत. त्याचबरोबर येथे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्याने दारू विक्रीला शासनाचा अधिकृत परवाना दिला जात नाही. येथे दारू विक्रीला बंदी असताना येथे गुपचूप पणे सर्रास अवैध देशी विदेशी दारू विकली जाते. अवैध दारूचे अनेक ठिकाणी धंदे आहेत. अनेकदा स्थानिक गुन्हे शाखा, शिर्डी पोलीस छापे टाकतात. मात्र काही दिवसांनी परत जैसै थे परिस्थिती येथे होते. शिर्डीत नुकतेच स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना चालत असल्याचे उघडकीस आले. यापूर्वी अनेक छापे टाकून पोलिसांनी असे धंदे बंद केले होते. पण परत हे धंदे सुरू होतात.


येथे आलेल्या साई भक्तांची वेगवेगळ्या मार्गाने आर्थिक फसवणूक काही भामट्यांकडून होत असते. या सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीतून चोऱ्यांमधून अवैधंद्यांमधून घाम न गाळता मिळालेला पैसा मटका जुगार गांजाचा चरस दारू पिण्यामध्ये या भामट्यांकडून उडवला जातो. गुन्हेगारी प्रवृत्ती त्यामुळे फोफावत जात आहे. गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या आहेत. अवैध धंद्यांतून मिळालेला पैसा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळला जात आहे. दादागिरी, शिवीगाळ, हाणामाऱ्या खून आदींपर्यंत या गुन्हेगारी टोळ्यांची मजल जात आहे. शिर्डी हे मोठे शहर बनले आहे .मात्र त्याचबरोबर गुन्हेगारही वाढत चालली आहे. देशात, जगात शिर्डीचे नाव आहे. त्यामुळे शिर्डीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून केंद्र, राज्य शासन मोठे प्रयत्न करत आहेत. शिर्डीला सुसज्ज पोलीस स्टेशन,

पोलीस उपविभागीय कार्यालय तसेच पोलिसांचे निवासस्थान अशा भव्यदिव्य इमारती झाल्या आहेत. सर्व सुविधा येथे आहे. मात्र येथे भौतिक सोयी सुविधा भरपूर वाढल्या आहेत .लोकसंख्या वाढली आहे .पण गुन्हेगारी प्रवृत्ती अवैध धंद्यामुळे अनेकदा साई भक्तांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तो कमी होण्याच्या ऐवजी वाढतच चालला आहे. साई भक्तांप्रमाणेच ग्रामस्थांनाही अनेकदा त्याचा त्रास आता वाढू लागला आहे. त्यामुळे विशेषतः आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी शहरांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी शेखर साहेब , यांनी सुद्धा विशेष लक्ष घालावे. येथे वाढत जाणारी गुन्हेगारी प्रवृत्ती, अवैध धंदे ,गुन्हेगारी टोळ्या, मोटरसायकल चोरी, धुम स्टाईल चोऱ्या यावर पूर्णतः पायबंद बसून साई भक्त, ग्रामस्थांना शिर्डी शहर भयमुक्त, एक सुरक्षित असे शहर वाटेल .यासाठी प्रयत्न करावेत. अशीच साई भक्तांची, ग्रामस्थांची मागणी आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button