
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना सरकारकडून गिफ्ट देण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता न मिळाल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती. पण आता बॅंकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

1500 रुपयांवरच मानावं लागणार समाधान
लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये अनुदान अर्थसंकल्पीय अधिवेशानात देण्याच्या घोषणेपासून सरकारनं घूमजाव केलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशानात 2100 रुपये देण्याचं आश्वासन कधीच दिलं नसल्याचं महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरेंनी सांगितलंय.
त्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलंय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सुरू करण्यात आलेली लाडकी बहिण योजना निवडणुकीत गेंमचेंजर ठरली. राज्यात पुन्हा सत्तेवर आल्यावर लाडक्या बहिणांना 1500 रुपयांवरून 2100 रुपये दिले जातील असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं.
मागील अधिवेशनात तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपयांसदर्भातली घोषणा करणार असल्याची माहिती दिली होती. मात्र आता यावरून सरकारने घूमजाव केलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपये देण्याची घोषणा आम्ही कुठेही केली नाही. तो जाहीरनामा 5 वर्षांसाठी असल्याचं आदिती तटकरेंनी सांगितलंय.