Letest News
राहाता येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी पाठपुरावा वेगात-डॉ. राजेंद्र पिपाडा यांची आरोग्यमंत्री प्रकाश आबि... शिर्डीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे यांना ‘समाज रत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर मराठीचे जतन-संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी — जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे प्रतिपादन शिर्डीतील सेवाधाऱ्यांची आरोग्यासाठी हाक-श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट रुग्णालयात मोफत उपचारांची मागणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळचा सक्तीवर युटर्न-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनंतर... केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा अहिल्यानगर जिल्हा दौरा-सामाजिक न्याय योजनांचा सखोल आढावा! साईनगरीत दलालांविरुद्ध ‘ऑपरेशन क्लीन कॉरिडॉर’ प्रशासनाचा लोखंडी हात-थेट गुन्हे दाखल! “रडू नका… उत्सवाने निरोप द्या!” — राधा काकूंचा मृत्यूलाही हरवणारा सकारात्मक संदेश संगमनेर तहसील कार्यालयात एसीबीचा सापळा- महसूल सहाय्यक १० हजारांच्या लाचेसह रंगेहाथ पकडला! गजर भक्तीचा.. साई हरी नामाचा ५३ वा सार्वजनिक कीर्तन सोहळा उत्साहात!
अ.नगरराजकीय

शिर्डीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे यांना ‘समाज रत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

राहाता : येथील श्री बिरोबा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सालाबादप्रमाणे दिला जाणारा यंदाचा ‘समाज रत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, शिर्डी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच शिर्डी येथील महेश लोढा यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे यांनी आपल्या कार्यकाळात शिर्डी व परिसरातील अनेक सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. विविध गंभीर गुन्ह्यांची उकल करून गुन्हेगारांना जेरबंद करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे शिर्डी परिसरातील गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात आळा बसला असून, पोलीस खात्याची प्रतिमा जनमानसात अधिक उंचावली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


विशेष म्हणजे, अडचणीत सापडलेल्या नागरिकांनी — विशेषतः महिला भगिनींनी — कोणत्याही वेळी संपर्क साधल्यास तत्काळ प्रतिसाद देत मदत पोहोचविण्याची त्यांची कार्यशैली सर्वत्र कौतुकास्पद ठरली आहे. “सेवा, सुरक्षा आणि संवेदनशीलता” या तत्त्वांवर आधारित त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी मानले जात आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ट्रस्टतर्फे ‘समाज रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


हा पुरस्कार सोहळा वै. ह.भ.प. सजन यशवंत सदाफळ व वै. भाऊसाहेब सजन सदाफळ यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या जगदगुरू संत तुकाराम मंदिर 15 चारी येथे गुरुवार दि. ५ मार्च २०२६ रोजी संत तुकाराम महाराज बीज निमित्त आयोजित करण्यात आला आहे.


यावेळी सकाळी १० ते १२ या वेळेत वैष्णव महाराज जाधव यांच्या हस्ते बीज कीर्तन सेवा संपन्न होणार असून, त्यानंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ‘समाज रत्न’ पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष व विधिज्ञ रामनाथ सदाफळ यांनी केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button