Letest News
शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम “भोंदू बाबाच्या कुकर्मांनी महाराष्ट्र हादरला-आता मोठ्या लोकांचे धागेदोरे बाहेर येणार?” – अमोल मिटकरी... किशोरी पेडणेकर यांचा शिर्डीत संतापाचा स्फोट! किशोरी पेडणेकर : “कॅप्टनच्या नावाखालील राक्षस उघड करा!” साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ
राजकीयशिर्डी

शिर्डी मतदानाचा जल्लोष! नवरदेवाचं ‘डोळ्यात भरलेलं’ मतदान सर्वांच्या चर्चेत-शेरवानीतला नवरदेव मतदानाला! केंद्रावर टाळ्यांचा कडकडाट

शिर्डीत अनेक घरांत आज लग्नसोहळे असतानाही नागरिकांनी ‘पहिले मतदान, नंतर लग्न’ या भूमिकेचा अंगीकार करत केंद्रांवर लांबच लांब रांगा लावल्या. काही जणांनी तर लग्नाला जाण्यापूर्वी, तर काहींनी लग्न करून लगेच केंद्रात दाखल होत आपला लोकशाहीचा हक्क बजावला. चेहऱ्यावरचा आनंद, बोटावरची शाई—दोन्ही सारखेच महत्वाचे वाटत होते.

sai nirman
जाहिरात

शेरवानीतला नवरदेव मतदानाला! केंद्रावर टाळ्यांचा कडकडाट

शिर्डी प्रभाग क्र. २ मधील जिल्हा परिषद शाळेत एक हटके आणि हृदयाला भिडणारा प्रसंग पाहायला मिळाला. रहिवासी ओमकार वारुळे आज आपल्या विवाहबद्ध होत आहेत… पण बोहल्यावर चढण्यापूर्वी त्यांनी बजावली ती लोकशाहीची ‘खरी’ परंपरा!

DN SPORTS

शेरवानी, पगडी, फुलांचा हार… अगदी परंपरागत नवरा सजून ओमकार थेट मतदान केंद्रावर दाखल झाले. त्यांना पाहताच केंद्रावर उपस्थित सर्व मतदार काही क्षणांसाठी थबकले, आणि लगेचच दणदणीत टाळ्यांनी स्वागत झाले.
मोबाईल कॅमेरे उघडले, स्मित हास्य पसरले आणि नवरदेव मतदानावर मोहर उमटवताना सर्वांनी तो क्षण कैद केला.

ओमकार यांनी मतदान केल्यानंतर सांगितलं –
“लग्न आयुष्यातील सुवर्णक्षण… पण मतदान हा जबाबदारीचा क्षण! देशाला दिशा देणाऱ्या या कर्तव्याला प्राधान्य दिलं, हे माझ्यासाठी आजचं सर्वात मोठं शुभकार्य.”

तरुणांसाठी ठरला ‘रोल मॉडेल’

नवरदेव मतदान केंद्रात आला ही बातमी विजेच्या वेगाने पसरली. अनेक तरुणांनी त्याचा आदर्श घेत मतदानासाठी जय्यत तयारी दाखवली. “लग्न असलं तरी मतदान चुकवायचं नाही”, असं वातावरण अनेक केंद्रांवर दिसून आलं.

मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता

kamlakar

प्रशासनानेही तरुणांचा उत्साह पाहून समाधान व्यक्त केलं असून मतदानाचा टक्का यामुळे लक्षणीय वाढेल, अशी अपेक्षा आहे.


आज शिर्डीत मतदान फक्त प्रक्रिया नव्हती… तो लोकशाहीचा उत्सव होता – आणि त्या उत्सवाचा ‘स्टार’ ठरला शेरवानीतला नवरदेव!

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button