Letest News
१५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्... ग्रामीण स्वप्नांना सरकारी नोकरीची वाट-शिर्डीच्या साई निर्माण करिअर अकॅडमीमधून ७० जण सेवेत साईनगरीत गुन्हेगारांचा मोकळा संचार! दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावून चोर फरार 🚨
क्राईमशिर्डी

शिर्डी पोलीस स्टेशनने ‘दैनिक साई दर्शन’च्या बातमीची घेतली दखल सुगंधित तंबाखू विक्रीप्रकरणी छापा- ४-९४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी शहरात खुलेआम सुरू असलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूच्या अवैध विक्रीवर अखेर शिर्डी पोलीस स्टेशनने धडक कारवाई केली असून, ‘दैनिक साई दर्शन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची सत्यता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. मात्र या कारवाईमुळे एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे — फक्त किरकोळ विक्रेत्यांवरच कारवाई केली परंतु खरे गुटखा माफिया अजूनही मोकाट कसे?

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


महाराष्ट्र राज्यात विक्रीस पूर्णतः बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू व पान मसाल्याची चोरीछुपी विक्री सुरू असल्याची माहिती दैनिक साई दर्शनने उघड केल्यानंतर, शिर्डी पोलीस स्टेशनने तात्काळ दखल घेत दि. 19 जानेवारी 2026 रोजी धडक छापा टाकला.


FIR नं. 0046/2026; भा.न्या.सं. कलम 274, 275 अंतर्गत गुन्हा
या प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे
गुन्हा रजिस्टर क्र. 0046/2026 अन्वये
दि. 19/01/2026 रोजी सायं. 5.56 वाजता
भा.न्या.सं. कलम 274, 275 तसेच संबंधित अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पालखी रोड, कानिफनाथ चौकात छापा
पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,
विनोद बाबुराव ठोंबरे (वय 50, रा. नांदुख शिवार, ता. राहाता)
हा पालखी रोड, कानिफनाथ चौक, शिर्डी येथे आपल्या चहाच्या करत आहे.
या माहितीच्या आधारे पंचांना बोलावून
सकाळी 11.30 वाजता छापा टाकण्यात आला.


४,९४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त
छाप्यात आरोपीकडून —
तुलसी सुगंधित तंबाखूचे 5 बॉक्स
डायरेक्टर पान मसाल्याचे 4 बॉक्स
असा ₹4,945 किमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मोठ्या माशांना कधी जाळं?
ही कारवाई स्वागतार्ह असली तरी शहरात खुलेआम फिरणारे गुटखा तस्कर ‘बंटी’ व ‘खाबिया’ अजूनही मोकाट कसे?
ते कुणाच्या आशीर्वादाने व्यवसाय करत आहेत?

शिर्डी हे देशातील मोठे तीर्थक्षेत्र असताना, येथे गुटखा माफियांचे साम्राज्य उभे राहत असेल तर ते अन्न व औषध प्रशासनाचे अपयश नाही काय?
लहान विक्रेत्यांवर छापे टाकून मोठ्या गुटखा माफियांना हि धरून मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.


पुढील तपास सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट हवालदार उदावंत करीत आहेत.

थांबणार नाही…
‘दैनिक साई दर्शन’ गुटखा, तंबाखू, अवैध धंदे आणि माफियांच्या विरोधात आवाज उठवत राहील
आणि मोठ्या आरोपींवर कारवाई होईपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा ठाम इशारा देण्यात आला आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button