Letest News
शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल शिर्डीतील रिक्षा लूट प्रकरणाने उघडे पाडले गंभीर प्रश्न! शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका! शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्...
अ.नगरक्राईम

खून प्रकरणातील सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

राहाता (प्रतिनिधी) राहता येथील खून प्रकरणातील सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि 23/05/2022 रोजी श्रीरामपुर येथील कुकी हॉटेल येथे झालेल्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीचा मुलगा नामे योगेश किसन वाघमारे ला‌।) ललित पाळदे व 2) राहुल धिवर यांनी त्याचे मोटार सायकल वरून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

पळवुन नेत त्यास आबेडकरनगर येथील घरकुल मधील संजय दादा निकाळे यांचे राहते घरी जावुन तेथे रवि दशरय कटारनवरे , बिरेन उर्फ पिंटु दशरथ कटारनवरे दशरथ कटारनवरे ,भुषण संजु निकाळे , योगेश सन्तु निकाळे , संजय दादु निकाळे रतनबाई दशरथ कटारनवरे , मनिका वाघमारे अमित चंद्रकात वाघमारे संगीता संजय निकाळे , उत्कर्ष ऊर्फ भैय्या सोमनाथ लुटे सोमनाथ लुटे ,विशाल मोकळ , महेश सोमनाथ पाळदे , गौतम सोमनाथ पाळंदे , अमोल सोमनाथ पांळदे सर्व राहाता यां इसमानी एकत्र येऊन संगनमत करुन रवि कटारनवरे याने योगेश वाघमारे

याच्या छातीत तलवारीने तसेच संजय निकाळे, ललित बाबासाहेब पांळदे यांच्या हातात कोयता होता त्यांनी योगेश याच्या डोक्यात व त्याचे हाताचे बोटावर वार करून जिवे ठार मारले आहे. तसेच साक्षीदार यांना देखील मारहाण करून जखमी केले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून गु.र.नं. 243/2022 भा.द.वि.क.302,363, 334,143,147,148, 149,504,506 आर्म अक्ट क 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. याप्रमाणे एकुण 18 आरोपी विरुध्द गुन्हयाची नोंद झाली होती. सदर गुन्हयाचा तपास

पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड( राहाता पोलीस स्टेशन) यांनी करुन दोषारोपत्र न्यायालयात सादर केले.सदर खटल्यात गुन्हयाची चौकशी दरम्यान आरोपीना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सदरच्या खटल्यात सरकार पक्षा तर्फे एकुण 09 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये सदर खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व इतर साक्षीदाराच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या, समोर आलेला सबळ पुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपी पैकी एकुण 06 आरोपी नामे 1) राहुल एकनाथ घिवर 2)

ललीत बाबासाहेब पोळचे 3) रवि दशरथ कठारनवरे 4) विरेन उर्फ पिंटु दशरथ कठारनवरे 5) विशास मायकल मोकळ 6) योगेश संजय निकाळे सर्व रा. आंबेडकर नगर राहाता याना सत्र न्यायालयाने जन्मठेप व प्रत्येकी 35,000/- रुपये दंडाची शिक्षा दि.21/02/2025 रोजी सुनावण्यात आली.


सरकार पक्षा तर्फे सरकारी अभियोक्ता डी. बी. पानगवाणे, पी. व्ही. बुलबुले यांनी काम पाहीले व त्यांना सरकारी अभियोक्ता मयुरेश नवले यांनी सहाय केले सदर खटल्याचे कामकाजावेळी अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर श्री वैभव कलुबर्मे तसेच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिरीष वमने, श्री. नितीन चव्हाण पोलीस निरीक्षक राहाता पोलीस स्टेशन याचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी पोहेकॉ/956 साईनाथ पुंजा कुदळ यांनी कामकाज पाहिले.तरसरकार तर्फे पांनगव्हाने व बुलबुले यांनी कामकाज बघितले. तर बचाव वकील धोर्डे, जोशी, गांधी यांनी कामकाज बघितले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button