Letest News
खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका राज्यातील शासकीय रुग्णालयांत मोफत उपचारांना ब्रेक! आता उपचारांसाठी रुग्णांना मोजावे लागणार पैसे शिर्डीत मध्यरात्री थरार! ‘झिंग्या गँग’चा तरुणावर जीवघेणा हल्ला शिर्डीच्या मातीचा जागतिक झेंडा! ‘Future IP Leader Award’ने गौरव लोकचंदानी यांचा सन्मान 24 तासांत न्याय! कर्तव्यदक्ष कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांची कणखर व निर्भय कारवाई दबावाला न ज... अहिल्यानगरमध्ये कारवाई… शिर्डीत कधी? ब्लॅक फिल्मविरोधात ४५८ वाहनांवर दंड-नागरिकांचा सवाल तीन पत्ती तिरट जुगार खेळणारे ६ जण ताब्यात-रोख रक्कम-मोबाईल व दुचाकी जप्त
राजकीयशिर्डी

शिर्डी परिक्रमा : भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य – अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकरांचा आदेश

शिर्डी, दि. ५ :
आगामी १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिर्डी साई परिक्रमेदरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने काटेकोर व सर्वसमावेशक नियोजन करावे. भाविकांची सुरक्षा, आरोग्य सेवा व स्वच्छता यांना सर्वोच्च प्राधान्य देत परिक्रमा मार्गावर आवश्यक सर्व सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात, असे स्पष्ट निर्देश अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिले.
ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी परिक्रमेदरम्यान डीजे व फिरत्या साऊंड सिस्टीम (बॅन्ड) वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, केवळ निश्चित ठिकाणी स्थिर स्वरूपात भजन व पारंपरिक वाद्य वादनासच परवानगी देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डी साई परिक्रमेच्या पार्श्वभूमीवर आयोजित आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस शिर्डी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, नगराध्यक्षा जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय महसूल अधिकारी माणिक आहेर, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, तहसीलदार अमोल मोरे, संस्थान प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, गटविकास अधिकारी विवेक गुंड यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


परिक्रमा मार्गावरील अन्नदान स्टॉलधारकांनी कचरा व्यवस्थापनाचे काटेकोर पालन करावे. डस्टबिन व मोठ्या ड्रमची व्यवस्था करून प्लास्टिक कचरा तत्काळ संकलित करावा. नगरपालिकेने रस्ते दुरुस्ती, स्वच्छता व पथदिव्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत. सेंट लॉर्न हॉटेल ते एसटीपी मार्गावरील अरुंद रस्त्याच्या बाजूला मुरूम टाकून सपाटीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले.


महावितरणने लोंबकळणाऱ्या विद्युत तारांची उंची वाढवावी, अंधाराच्या ठिकाणी हॅलोजन दिवे लावावेत व आवश्यक त्या ठिकाणी कर्मचारी तैनात ठेवावेत, असेही निर्देश देण्यात आले.
भाविकांच्या आरोग्यासाठी परिक्रमा मार्गावर १० रुग्णवाहिका, फिरती वैद्यकीय पथके व ओआरएस केंद्रे उभारण्यात येणार आहेत. महिला भाविकांसाठी फिरती स्वच्छतागृहे राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. १२ फेब्रुवारी रोजी वाहतूक बंदी लागू होण्यापूर्वीच पाण्याचे टँकर व पुरेसा पाणीसाठा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले.


साकोरी शिवारातील वीटभट्ट्या व स्टोन क्रशरमुळे होणारी धूळ व चिखल टाळण्यासाठी संबंधित व्यावसायिकांनी परिक्रमेपूर्वी दोन-तीन दिवस कामकाज बंद ठेवावे. परिक्रमानंतर त्वरित साफसफाईसाठी विशेष पथके व घंटागाड्या तैनात ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नगर–मनमाड महामार्गावरील वाहतूक पर्यायी रिंग रोडने वळविण्याचे नियोजन करण्यात आले असून, भाविकांच्या वाहनांसाठी संस्थान व खासगी मोकळ्या जागांवर विनामूल्य पार्किंग व दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या रक्षक दगडांवर रिफ्लेक्टर बसवण्याचेही आदेश देण्यात आले.

पोलीस प्रशासनाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने १२ फेब्रुवारी रोजी मद्यविक्री बंद (ड्राय डे) काटेकोरपणे पाळण्याबाबत दक्षता घ्यावी, असेही श्री. कोळेकर यांनी स्पष्ट केले.
ग्रामपंचायतींनी स्वागत कमानीऐवजी स्वागत मंच उभारावेत. भविष्यातील नियोजनासाठी नगररचना विभागाने परिक्रमा मार्गाचे ३० मीटर रुंदीकरण करण्यासाठी मोजणी करावी व गर्दीचा ताण कमी करण्यासाठी परिक्रमेचा प्रारंभ बिंदू महामार्गाऐवजी पश्चिम बाजूस नेण्याबाबत आराखडा तयार करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या.


यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी गर्दी नियंत्रणासाठी खंडोबा मंदिर परिसरात मोठी एलईडी स्क्रीन उभारण्याचे व आरतीनंतर सकाळी ५:४० वाजता रथ प्रस्थानाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
ग्रीन अँड क्लीन शिर्डी फौंडेशनचे अजित पारख यांनी शिर्डी परिक्रमेचा सविस्तर आराखडा व भविष्यातील संकल्पचित्र सादर केले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button